Next
डॉ. वसंतराव देशपांडे जन्मशताब्दी महोत्सवात डॉ. प्रभा अत्रेंचे गायन
प्रेस रिलीज
Saturday, May 04, 2019 | 05:28 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : डॉ. वसंतराव देशपांडे संगीत सभेचे प्रमुख विश्वस्त पंडित चंद्रकांत लिमये व नागपूर येथील सांस्कृतिक केंद्र यांच्या विद्यमाने पाच मे २०१९ रोजी वसंतराव देशपांडे जन्मशताब्दी महोत्सवाच्या शुभारंभाचा सोहळा रवींद्र नाट्यमंदिर येथे सायंकाळी पाच ५ ते रात्री १० या वेळेत आयोजित केला आहे. 

या वेळी डॉ. देशपांडे यांच्या गायकीचे दर्शन घडविणारा ‘वसंत बहार’ हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. दृकश्राव्य माध्यमातून उलगडणाऱ्या या कार्यक्रमात डॉ. देशपांडे यांनी अजरामर केलेल्या बंदीशी, ठुमरी, नाट्यगीत, चित्रपटगीत आदी गीतप्रकार पं. चंद्रकांत लिमये आपल्या गुरुकुलमधील शिष्यांसह सादर करणार आहेत. त्यानंतर ग्वाल्हेर घराण्याच्या तरुण गायिका नुपूर काशीद-गाडगीळ व पद्मभूषण पंडिता डॉ. प्रभा अत्रे यांच्या गायनाचा कार्यर्कम होईल. हा कार्यक्रम जन्मशताब्दीनिमित्त सर्वांसाठी विनामूल्य  रसिकांसाठी विनामूल्य ठेवण्यात आला आहे.

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील महान गायक, मराठी संगीत रंगभूमीवरील अभिनेते, ज्यांनी आपल्या अद्वितीय, अविस्मरणीय गायकीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आणि ज्यांनी शास्त्रीय संगीत, ठुमरी, नाट्यसंगीत, चित्रपट, संगीत या सर्व प्रकारांवर आपल्या गायकीचा ठसा उमटविला, त्या डॉ. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सांगली, नाशिक, सोलापूर, बेळगाव, गोवा आदी ठिकाणी संस्थेतर्फे वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. महोत्सवाच्या उद्घाटन समारंभावेळी ‘नित्र वसंत’ ही विशेष स्मरणिकाही प्रकाशित केली जाणार आहे. 

या वेळी माजी लोकसभा अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री डॉ. मनोहर जोशी, पंडित शंकर अभ्यंकर, पंडित सत्यशीला देशपांडे, श्रीमती फैयाज, अच्युत गोडबोले, माजी पोलीस आयुक्त अरविंद इनामदार आदी मान्यवर उपस्थित राहणार असून, ते डॉ. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा देणार आहेत. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search