Next
मराठी कल्चर अँड फेस्टिव्हल्स
BOI
Monday, October 09 | 05:58 PM
15 0 0
Share this story

'मराठी कल्चर अँड फेस्टिव्हल्स'चा २०१७ चा दिवाळी अंकमहाराष्ट्राला दिवाळी अंकांची उज्ज्वल परंपरा लाभली आहे. मराठी माणूस जगभरात कोठेही गेला, तरी त्याला महाराष्ट्रातील सणसमारंभांची आठवण स्वस्थ बसू देत नाही. मग दिवाळी अंक तरी त्याला अपवाद कसे असणार? परदेशस्थ अनेक साहित्यप्रेमी मराठी माणसे ई-दिवाळी अंक प्रसिद्ध करतात. त्यापैकीच एक म्हणजे ‘मराठी कल्चर अँड फेस्टिव्हल्स’ हा अंक. ऑनलाइन वाचनासाठी मोफत उपलब्ध असलेल्या या अंकाचा हा संक्षिप्त परिचय...
...........

विविध देशांमध्ये असलेल्या भारतीयांना आपल्या भारतीय संस्कृतीची आणि परंपरांची ओळख व्हावी, या उद्देशाने अमेरिकेत ‘मराठी कल्चर अँड फेस्टिव्हल्स’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेच्या संस्थापिका आणि व्यवस्थापकीय संचालिका ऐश्वर्या कोकाटे यांनी मराठी कल्चर अँड फेस्टिव्हल्स (http://www.marathicultureandfestivals.com) या नावानेच एक इंग्रजी वेबसाइट सुरू केली आहे. त्यावर काही मराठी लेख आणि साहित्यही उपलब्ध आहे. केवळ भारतीयच नव्हे, तर भारताबाहेरील लोकांनाही मराठी संस्कृतीची ओळख व्हावी, हा वेबसाइट सुरू करण्यामागचा उद्देश आहे. 

दिवाळीच्या निमित्ताने मागील दोन वर्षांपासून ‘मराठी कल्चर अँड फेस्टिव्हल्स’मार्फत ई-दिवाळी अंक प्रकाशित केला जातो. यंदाचा हा तिसरा दिवाळी अंक आहे. एक हौस म्हणून पहिल्या वर्षी प्रकाशित करण्यात आलेल्या दिवाळी अंकाला उदंड प्रतिसाद मिळाल्यामुळे दरवर्षी हा ई-दिवाळी अंक प्रकाशित करण्याचे ठरवले गेले. सुरुवातीला केवळ अमेरिकेतील मराठी व्यक्तींकडून साहित्य उपलब्ध होत असे. यंदा मात्र इतरही ठिकाणहून साहित्य उपलब्ध झाले आहे. 

यंदाच्या दिवाळी अंकात शर्मिला माहूरकर यांचा ‘बाप्पा मोरया’ हा लेख आहे. डॉ. गोखले यांचा बा. सी. मर्ढेकर यांच्यावरील लेख, डॉ. मुकुंद मोहरीर यांचा ‘आइनस्टाइन एक महान योगी’, किरण डोंगरदिवे यांचा ‘काव्यसरस्वती बहिणाबाई चौधरी’, जयदीप भोगले यांचा, ‘माध्यमे आणि बोलीभाषांचे वाढते महत्त्व’, धनश्री देसाई यांचा ‘आम्ही मराठी-तुम्ही मराठी’ यांसारख्या दर्जेदार आणि वैशिष्ट्यपूर्ण मराठी आणि इंग्रजी भाषांमधील लेखांचा समावेश आहे. तसेच शाळा, पाऊसपाणी, एक्झरसाइजच्या सागरात शोभाची नौका अशा कवितांचाही समावेश आहे. याव्यतिरिक्त मुलांसाठी ‘भारतीय फेस्टिव्हल्स अँड कल्चर्स’, ‘दिवाली’ असे काही लेख आहेत. शिवाय दिवाळीसाठी विशेष अशा काही रेसिपीजही या अंकात देण्यात आल्या आहेत. 

या दिवाळी अंकाचे सहसंपादक म्हणून पुण्याचे आशुतोष बापट, अमेरिकेतील श्री. व सौ. माटे आणि अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथील शोभना डॅनिएल यांनी काम पहिले आहे.  

पृष्ठसंख्या : ७४
(हा दिवाळी अंक ऑनलाइन वाचनासाठी मोफत उपलब्ध आहे. त्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link