Next
‘पशुसंवर्धन’तर्फे पंढरपूरमध्ये चारा, खत, बियाण्यांचे वाटप
BOI
Monday, November 05 | 03:42 PM
15 0 0
Share this story

सोलापूर : ‘दुष्काळी पंढरपूर तालुक्यातील पशुधन वाचविण्यासाठी पशुसंवर्धन विभागातर्फे शेतकऱ्यांना चारा, बियाणे व त्यासाठी लागणाऱ्या खतांचे वाटप मोफत करण्यात येणार आहे. त्यासाठी सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या पशुसंवर्धन दवाखान्याशी संपर्क साधून मागणी अर्ज भरून द्यावेत,’ असे आवाहन पंढरपूर येथील पशुसंवर्धन दवाखान्याचे सहायक आयुक्त डॉ. दिनकर बोर्डे यांनी केले आहे.

या वर्षी पंढरपूर तालुक्यात पुरेसा पाऊस पडला नसल्याने या तालुक्याची दुष्काळी तालुका म्हणून नोंद झाली आहे. दुष्काळी परिस्थितीतील उपाययोजना म्हणून पशुसंवर्धन विभाग शेतकऱ्यांना जनावरांसाठी चारा, बियाणे व त्यासाठी लागणाऱ्या खतांचा पुरवठा मोफत करणार आहे. यासाठी तालुक्यातील केवळ दोन हजार ८०० शेतकऱ्यांची निवड केली जाणार आहे. हा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्याकडे सिंचन सुविधा असणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी जवळच्या पशुसंवर्धन दवाखान्यात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link