Next
‘बालरंजन’मध्ये सिंगापूर-मलेशिया दौऱ्याचे सादरीकरण
प्रेस रिलीज
Monday, December 04 | 05:07 PM
15 0 0
Share this story

आशा होनवाड यांचा सत्कार करताना माधुरी सहस्रबुद्धेपुणे : येथील बालरंजन केंद्रातील आशा होनवाड यांनी नुकतीच सिंगापूर-मलेशियाचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी ‘बालरंजन’मधील मुलांसाठी काही आठवणी कॅमेऱ्यात बंदिस्त करून आणल्या. नुकतेच त्यांनी त्याचे सादरीकरण मुलांसमोर केले.

उंचच उंच ट्वीन टॉवर, बाटु केव्हमधील कार्तिकेयाचा पुतळा, स्ट्रॉबेरी बाग, लवेंडर गार्डन, पेनांग येथील निसर्गरम्य वातावरणातील बौद्धमंदिरे मुलांनी फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून पहिले. लंकावी बेटावरील गरुडाच्या भव्य पुतळ्याने मुलांना खिळवून ठेवले. तेथील काळी व पांढरी वाळू, निळेशार पाणी, गडद निळे डोंगर हे निसर्गसौंदर्य मुलांनी डोळे भरून पाहिले.

बालरंजन केंद्रात सादरीकरण करताना आशा होनवाडसिंगापूरच्या सेंटोसा आयलंडने मुलांना वेड लावले. तिथला लाईट व साऊंड शो, मोठे मत्स्यालय, वॅक्स  चे फोटो मुलांना भावले, जराँग बर्ड पार्कमधील पक्षांच्या रंजक व्हिडीओने कार्यक्रमाची सांगता झाली.

‘बालरंजन’च्या संचालिका माधुरी सहस्रबुद्धे यांनी होनवाड यांचे आभार मानले. संपूर्ण सहलीत मुलांना आवडतील अशा गोष्टी नेमकेपणाने निवडून मुलांना सिंगापूर-मलेशियाची सुंदर सफर घडवून आणल्याचे सहस्रबुद्धे यांनी या वेळी सांगितले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link