Next
‘आती रहेंगी बहारे’ कार्यक्रमाचे आयोजन
प्रेस रिलीज
Tuesday, April 03, 2018 | 05:22 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘दो नैना मतवारे तिहारे’, ‘रातोंके साये घनेरे’, ‘दिल क्या करें’, ‘यादोंकी बारात’, ‘दिल विल प्यार व्यार’ यांसारखी सदाबहार हिंदी चित्रपट गीते ऐकण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. निमित्त आहे प्रसिध्द संगीतकारांनी संगीतबद्ध केलेल्या हिंदी चित्रपटगीतांच्या ‘आती रहेंगी बहारे’ या सांगीतिक मैफलीचे. येथील फाटक कुटुंबीय चार एप्रिल २०१८ रोजी रात्री ९.३० वाजता कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणाऱ्या कार्यक्रमात हा सांगीतिक नजराणा सादर करणार आहेत.

या कार्यक्रमात प्रसिध्द संगीतकार पंकज मलिक, लक्ष्मीकांत–प्यारेलाल, शंकर–जयकिशन, एस. डी. व आर. डी. बर्मन, राजेश रोशन, रवींद्र जैन, सलील चौधरी यांनी संगीतबद्ध केलेली सदाबहार हिंदी चित्रपट गीते अनुभवता येणार आहे.

माधव फाटक, महेश फाटक, नरेंद्र फाटक, अरविंद फाटक, अर्चना सहस्रबुद्धे आणि कावेरी सहस्रबुद्धे हे वेगवेगळ्या पिढ्यांचे प्रतिनिधी हा कार्यक्रम सादर करतील. त्यांना चिंतन मोढा (कीबोर्ड व वाद्यवृंद संचालन), लिजेश शशीधरन (बेस गिटार), हार्दिक रावल (लीड गिटार), कुमार शेळडेकर (हार्मोनियम व मेंडोलीन) सचिन वाघमारे (फ्ल्यूट), आसिफ खान (ऑक्टोपॅड व ऱ्हीदम), हर्षद गनबोटे (ढोलक), विशाल गंड्रतवार (तबला) हे साथसंगत करतील.

कार्यक्रमाची तिकीटे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात दोन एप्रिलपासून सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० आणि सायंकाळी पाच ते रात्री नऊपर्यंत उपलब्ध असतील.  

कार्यक्रमाविषयी :
दिवस : बुधवार, चार एप्रिल २०१८
वेळ : रात्री ९.३० वाजता
स्थळ : यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड, पुणे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link