Next
कोरियन फूड फेस्टिवल
प्रेस रिलीज
Friday, February 23 | 12:44 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘हायत पुणे’ सर्व खवय्यांना परत एकदा एका आगळ्यावेगळ्या फूड फेस्टिवलसाठी आमंत्रित करत आहे. २१ फेब्रुवारी ते पाच मार्च या कालावधीत ‘बान टाओ’ या त्यांच्या अॅवॉर्ड विनिंग पॅन एशियन रेस्टॉरंटमध्ये हे फूड फेस्टिवल होणार आहे. शेफ जेआँग ह्वांग हे कोरियन एक्स्पर्ट शेफ असून, ते या फेस्टिवलसाठी बान टाओच्या समुहाला सहकार्य करणार आहेत.

कल्याणीनगर येथील हायत नेहमीच पुणेकरांना सर्वोत्तम देण्याच्या भावनेने आंतरराष्ट्रीय शेफ पुणेकरांसाठी घेऊन येत असतात. नोव्हेंबरमध्ये झालेल्या इंडोनेशियन फूडफेस्टिवलच्या यशानंतर हायत पुणे कोरियन कुझीन आणि त्यांच्या पाककलेचे दर्शन पुणेकरांना पुण्यातच अनुभवायला घेऊन आले आहेत. या फेस्टिवलमध्ये पुणेकर खवय्यांना सर्वोत्तम आणि सुप्रसिद्ध कोरियन पदार्थ, कोंडीमेंटस चाखायला मिळणार आहेत. किमची, बुलगोगी आणि मेर-गु-ल हे त्यांच्या अनेक पदार्थांपैकी काही आहेत.

‘गेल्या काही वर्षात कोरियन पदार्थांची लोकप्रियता फार झपाट्याने वाढली असून, पुणे हे कित्येक कोरियन लोकांचे घर देखील आहे आणि म्हणूनच आम्ही शेफ जेआँग यांना बोलाविले आहे,’ असे हायतचे मुख्य शेफ सुवेंदू रॉय म्हणाले. ‘पुणेकर आमचा विशेष बनविलेला फाईव्ह कोर्स ला कार्टे मेन्यूचा आनंद नक्की घेतील,’ अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

शेफ जेआँग पहिल्यांदाच भारतात येत असून, त्यांना भारतीय खाद्यसंस्कृतीचे विशेष आकर्षण आहे. ते भारत दौऱ्यासाठी फार उत्सुक आहेत. काही भारतीय पदार्थदेखील ते शिकणार आहेत. ग्रँड हायत, सिंगापोर येथे त्यांनी नुकतेच कोरियन पदार्थांचे प्रमोशन केले असून, पुणेकरांना आपली पाककला दाखविण्यास ते उत्सुक आहेत. त्यांची खासियत म्हणजे सामगेटांग (कोरियन चिकन सूप), जेओनबोल चो (कोळंबी व स्केलप्सचे सलाड) आणि बोसम प्लेट पुणेकरांसाठी बनविणार आहेत.

या फेस्टिवलदरम्यान लंच आणि डिनर या दोन्ही वेळी तुम्ही कोरियन पदार्थांची दावत अनुभवू शकता. गुरुवारी कोरियन स्ट्रीट फूडची मेजवानी असेल आणि सर्वांचे आवडते बानटाओचे संडे ब्रंचदेखील असेल. हायत पुणेने विविध उपक्रम आयोजित केले असून, कोरियन कम्युनिटीसाठी शेफ जेआँगचा मास्टरक्लास आहे.

फूड फेस्टिवलविषयी :
दिनांक : २१ फेब्रुवारी ते पाच मार्च २०१८
वेळ : लंच : दुपारी साडेबारा ते साडेतीन
         डिनर : सायंकाळी सात ते रात्री अकरा
ठिकाण : हयात, कल्याणी नगर, पुणे
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link