Next
पारंपरिक भारूडाने रोपळे गावातील हनुमान जन्मोत्सवाची सांगता
BOI
Monday, April 22, 2019 | 05:32 PM
15 0 0
Share this article:सोलापूर :
सोलापूर जिल्ह्यातील रोपळे (ता. पंढरपूर) येथील ग्रामदैवत श्री हनुमानाचा जन्मोत्सव नुकताच उत्साहात पार पडला. या सोहळ्याची सांगता शनिवारी (२० एप्रिल) भारूडाच्या कार्यक्रमाने झाली. या वेळी जिल्ह्यातील भारूडकारांनी सोंगी व जुगलबंदीचे भारूड सादर करून समाजप्रबोधन केले. येथील ग्रामदैवत श्री हनुमानाच्या जन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहामध्ये राज्यातील नामांकित कीर्तनकारांनी आपली कीर्तनसेवा सादर केली. भजन, काकडा व हरिपाठ या नित्याच्या कार्यक्रमांबरोबरच प्रवचनेही सादर झाली. शुक्रवारी (१९ एप्रिल) हनुमान जन्मोत्सव साजरा झाला. त्या वेळी भाविकांनी पुष्पवृष्टी करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. २० एप्रिल रोजी ग्रामदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. श्रींच्या चांदीच्या मुखवट्याची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. श्रींचे स्वागत करण्यासाठी ग्रामस्थांनी रस्ते स्वच्छ करून त्यावर आकर्षक रांगोळी काढली होती. दरम्यानच्या काळात गावात मोठ्या प्रमाणात अन्नदान करण्यात आले. शनिवारी नगर प्रदक्षिणा झाल्यावर दिवसभर मंदिरासमोर भारूडाचा कार्यक्रम पार पडला. जिल्ह्यातील काही भारूडकारांनी आपल्या खास शैलीत सोंगी व जुगलबंदीचे भारूड सादर करून समाजप्रबोधन केले. पारंपरिक भारूडाच्या कार्यक्रमाची परंपरा रोपळे गावाने जपली आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थ व ज्ञानेश्वर प्रासादिक भजनी मंडळाने परिश्रम घेतले.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 180 Days ago
Keep up the tradition . And an enjoyable activity for all .
0
0

Select Language
Share Link
 
Search