रत्नागिरी : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने एसएससी पास, नापास, बारावी पास, ड्रायव्हर, कोणत्याही शाखेचा पदवीधर, पदवीधारक आदी शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवारांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा २१ ऑक्टोबर २०१८ रोजी शहरातील रा. भा. शिर्के प्रशाला येथे सकाळी १० वाजता होणार आहे.
या मेळाव्यात किमान २५०हून अधिक रिक्तपदांची विविध खासगी क्षेत्रात भरती होणार असून, यात खासगी आस्थापनेचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत; तसेच उमेदवारांच्या त्याचदिवशी मुलाखती घेऊन प्राथमिक निवड करणार आहेत.
रोजगार मेळाव्यात हजर राहण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडील ओळखपत्र व आपल्या शैक्षणिक पात्रतेची मुळ प्रमाणपत्र, पासपोर्ट साइज फोटोंसह चार प्रती स्वत:चा बायोडाटा घेऊन स्वखर्चाने उपस्थित रहावे. उमेदवारांनी या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता केंद्राचे प्रभारी सहाय्यक संचालकांनी केले आहे.
मेळाव्याविषयी :
दिवस : रविवार, २१ ऑक्टोबर २०१८
वेळ : सकाळी १० वाजता
स्थळ : रा. भा. शिर्के प्रशाला, माळनाका, रत्नागिरी.
अधिक माहितीसाठी संपर्क : ०२३५२- २२१४७८