Next
‘बँक ऑफ बडोदा’तर्फे मॅरेथॉनचे आयोजन
प्रेस रिलीज
Wednesday, June 12, 2019 | 01:00 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : बँक ऑफ बडोदाने बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे अडीच हजार कर्मचाऱ्यांसाठी पाच किलोमीटर सन रन मॅरेथॉनचे आयोजन केले होते. सर्व कर्मचाऱ्यांमध्ये स्नेहाचे नाते तयार करून त्यांच्यात एकीची भावना निर्माण करण्याचा उद्देश मॅरेथॉन आयोजनामागे होता.

मॅरेथॉनमुळे आरोग्याला होणाऱ्या फायद्यांची सर्वत्र दखल घेतली जात असून, त्याचा वापर कर्मचाऱ्यांचा एकमेकांशी असलेला संवाद वाढवण्यासाठीही चांगल्या प्रकारे केला जाऊ शकतो. ‘सन रन’बरोबरच कर्मचाऱ्यांसाठी झुंबा, रस्सीखेच, मिनी व्हॉली बॉल, ग्लास पिरॅमिड, पेनल्टी शूटआउट आणि प्रॉप्ससह सेल्फी- बुथ अशा विविध उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. बँकेने यापूर्वीही कर्मचाऱ्यांसाठी विविध प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन केले होते व त्यात संगीत कॉन्सर्ट, क्रीडा दिवस, मानवी साखळी यांचा समावेश होता व त्यात कॉर्पोरेट आणि प्रादेशिक कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येत मजेदार उपक्रमांचा आनंद घेतला.

बँक ऑफ बडोदाचे ब्रँड प्रसारक आणि जगातील सर्वोच्च मानांकन असलेले बॅडमिंटन खेळाडू किदाम्बी श्रीकांत हे या उपक्रमासाठी उपस्थित होते. सन रन या उपक्रमाला मिळालेल्या यशामुळे बँक ऑफ बडोदाने इतर शहरांतही असे उपक्रम आयोजित करण्याचे ठरवले आहे.

या विषयी बोलताना बँक ऑफ बडोदाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पीएस जयाकुमार म्हणाले, ‘या मॅरेथॉनमध्ये निरोगी राहाण्याचे तसेच बँक ऑफ बडोदा, विजया बँक आणि देना बँक अशा तीन बँकांच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने एकत्रित येत एक भव्य संस्था उभारण्याचे महत्त्व अधोरेखित झाले. या उपक्रमाला दिलेल्या सहकार्याबद्दल आम्ही आमच्या विमा भागीदारांचे आभारी असून, तीन मोठ्या संस्थांना एकत्र आणणाऱ्या या उपक्रमाचे एक वार्षिक परंपरेत रूपांतर करणे मला आवडेल.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search