Next
‘लोक काय म्हणतील, याचा विचार करू नका’
पुणे शहर वाहतूक पोलिस उपायुक्त तेजस्वी सातपुतेंचा सल्ला
प्रेस रिलीज
Tuesday, February 12, 2019 | 03:59 PM
15 0 0
Share this storyपुणे : ‘कायद्याने मुलींना अधिक संरक्षण दिले आहे. त्याचा चांगला वापर करून अन्यायाविरोधात आवाज उठवला पाहिजे. एक जबाबदार भारतीय नागरिक म्हणून आपण आपली कर्तव्ये बजवावीत. ‘लोक काय म्हणतील’ ही भीती मनातून काढून टाकून स्वतःला घडविण्यासाठी प्रयत्न करावेत,’ असा सल्ला पुणे शहर वाहतूक पोलिस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी विद्यार्थिनींना दिला.येवलेवाडी येथील केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या केजे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट रिसर्चच्या महिला विकास केंद्रातर्फे संस्थेतील विद्यार्थिनींसाठी ‘महिला सक्षमीकरण व वाहतूक जनजागृती’ या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यात मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. या वेळी कोंढवा वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक सी. एम. निंबाळकर, संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत अभ्यंकर, डॉ. व्यासराज काखंडकी, कार्यशाळेचे समन्वयक व प्राचार्य डॉ. सुहास खोत, महिला विकास केंद्राच्या प्रमुख प्रा. अमृता ताकवले, प्रा. रोहिणी आगवणे, प्रा. ऋतुजा मोरे, प्रा. पूजा चौधरी आदी उपस्थित होते.सातपुते म्हणाल्या, ‘आर्थिक परिस्थिती चांगली म्हणजे महिला सक्षम आहे, असे नाही. चांगले शिक्षण घेऊन, निर्धास्तपणे स्वतःला घडविणे गरजेचे असते. योग्यवेळी योग्य निर्णय घेता आला पाहिजे. त्यासाठी शिक्षण आणि ज्ञानाची गरज आहे. कायद्याविषयी जाणून घेत योग्य ठिकाणी त्याचा वापर करावा. कोणाला त्रास देण्याच्या हेतूने कायद्याकडे बघू नये. मात्र, लैंगिक अत्याचाराला बळी न पडता तात्काळ आवाज उठवण्याची हिंमत मुलींनी-महिलांनी बाळगावी. त्यासाठी पोलिस काका, विशाखा समिती, बडी कॉपची मदत घ्यावी. वाहतुकीचे नियम पाळण्यासोबतच हेल्मेट, सीटबेल्टचा वापर केला पाहिजे.’या कार्यशाळेत विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. या वेळी विद्यार्थिनींना हेल्मेट वाटप करण्यात आले. सीएम निंबाळकर, डॉ. हेमंत अभ्यंकर यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक डॉ. सुहास खोत यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. प्राजक्ता देशमुख यांनी केले. प्रा. अमृता ताकवले यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link