Next
‘डॅनुबे’च्या ‘यूएई’ निवासी परवान्यात १० वर्षांपर्यंत वाढ
प्रेस रिलीज
Friday, May 25, 2018 | 12:27 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : यूएई कॅबिनेटने अलीकडेच परदेशी गुंतवणूकदार, उच्चशिक्षित व्यावसायिक आणि प्रतिभावान विद्यार्थ्यांसाठी निवासाचा परवाना १० वर्षांपर्यंत वाढवणे, तसेच खासगी कंपन्यांसाठी १०० टक्के परदेशी मालकीस परवानगी देणे असे दोन निर्णय जाहीर केले आहेत. यामुळे देशाच्या बांधकाम व मालमत्ता क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येणे अपेक्षित आहे. डॅनुबे समूह आणि त्यांचा बांधकाम विभाग डॅनुबे प्रॉपर्टीज यांना नवीन मालमत्ता खरेदीदार तसेच गुंतवणूकदारांना सेवा देण्यासाठी अधिक पोषक वातावरण मिळणार आहे.  

रिझवान साजनडॅनुबे समूह आणि डॅनुबे प्रॉपर्टीजचे अध्यक्ष रिझवान साजन म्हणाले, ‘हा अनेकांसाठी आश्चर्याचा सुखद धक्का असेल. कारण, गल्फ को-ऑपरेशन कौन्सिलच्या धोरणानुसार, परदेशी व्यक्तींना दीर्घकालीन निवासी परवाना मिळणार नाही हा समज यामुळे मोडीत निघाला आहे. ‘यूएई’मध्ये नोंदणी झालेल्या कंपन्यांसाठी १०० टक्के परदेशी मालकीला परवानगी देणे हा आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय असून, यामुळे ‘यूएई’ला त्यांच्या प्रदेशातील शेजाऱ्यांच्या तुलनेत पुढील स्थान प्राप्त करता येईल. त्याचप्रमाणे अधिकाधिक वैश्विक प्रतिभा आपल्याकडे वळवणेही ‘यूएई’ला शक्य होईल.’

दुबईस्थित विकासक डॅनुबे प्रॉपर्टीजकडे तीन हजार ६२८ निवासी जागांची (घरांची) ३.१४ अब्ज दिरहॅम मूल्याची श्रेणी असून, दक्षिण आशिया, विशेषत: भारतातील, गुंतवणूकदारांच्या वाढत्या संख्येला सेवा देण्यास ते सज्ज आहेत. दुबईतील रिअल इस्टेटमधील सर्वांत मोठा परदेशी गुंतवणूकदारांचा समूह भारतीय नागरिकांचा आहे. भारतीयांनी दुबईतील मालमत्ता क्षेत्रात गेल्या पाच वर्षांमध्ये २०१३ ते २०१७ या काळात ८३.६५ अब्ज दिरहॅम मूल्याच्या मालमत्तांची खरेदी केली आहे. दुबई जमीन विभागाने दिलेल्या आकडेवारीतून हे स्पष्ट होते. भारतीयांनी २०१७मध्ये दुबईतील रिअल इस्टेटमध्ये १५.६ अब्ज दिरहॅमची गुंतवणूक केली. २०१६मध्ये १२ अब्ज दिरहॅमची गुंतवणूक केली, तर २०१५मध्ये सर्वाधिक २० अब्ज दिरहॅमची गुंतवणूक केली, असे डीएलडीच्या अहवालातून दिसते.

साजन म्हणाले, ‘भारत आणि ‘यूएई’मध्ये उद्योगाची खोलवर गेलेली मुळे असलेला डॅनुबे समूह आता भारत आणि अन्य आग्नेय आशियाई देशांतील ग्राहकांना सेवा देण्यास सक्षम आहे. डॅनुबे समूहाने ८२७ घरांचा ताबा पूर्वनियोजित बजेटमध्ये, तसेच दिलेल्या वेळेत दिला आहे व या वर्षात ताबा देण्यासाठी आणखी ८७० घरे सज्ज होत आहेत. त्यामुळे समुहाचा नवीन गुंतवणूकदारांना मदत करण्याचा लौकिक कायम आहे. आमची सुमारे दोन हजार घरे विकासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर असून, ती सर्व घरे पुढील दोन वर्षांत पूर्ण होणार आहेत.’  

या दुहेरी निर्णयामुळे परदेशी व्यक्तींचा निवासी परवाना १० वर्षांपर्यंत वाढवला जाणार आहे. त्याचप्रमाणे व्यवसायांमध्ये १०० टक्के परदेशी मालकीला परवानगी मिळाल्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला गेल्या १० वर्षांत मिळाली नव्हती एवढी जोरदार चालना मिळणार आहे. हे निर्णय योग्यवेळी घेण्यात आले आहेत. एक महान असा भविष्यकाळ घडवण्यासाठी टाकलेले हे योग्य पाऊल आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search