Next
जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रणिता कोटकर प्रथम
बॅ. नाथ पै स्मृती आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचे सिंधुदुर्गातील आचरे येथे आयोजन
BOI
Tuesday, January 15, 2019 | 05:40 PM
15 0 0
Share this article:

विजेते विद्यार्थी आणि मान्यवर

मालवण :
बॅ. नाथ पै स्मृती सिंधुदुर्ग जिल्हा स्तर आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत कुडाळच्या व्हिक्टर डॉन्टस विधी महाविद्यालयाची प्रणिता प्रदीप कोटकर हिने प्रथम क्रमांक मिळवला. साने गुरुजी कथामाला (मालवण) आणि कोकण मराठी साहित्य परिषदेची मालवण शाखा यांनी नुकतीच ही स्पर्धा आयोजित केली होती. आचरे येथील बॅ. नाथ पै नगरीत, केंद्र शाळा (आचरे नं. १) येथे ही स्पर्धा पार पडली. 

स्पर्धेचा निकाल असा :
प्रथम : प्रणिता प्रदीप कोटकर (व्हिक्टर डॉन्टस विधी महाविद्यालय, कुडाळ)
द्वितीय : गौरी धाकू मेस्त्री (विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी कॉलेज, तळेरे)
तृतीय : अनघा प्रकाश पंडित (स. ह. केळकर महाविद्यालय, देवगड)

उत्तेजनार्थ :
प्रथम : हर्षदा संजय परब (पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी)
द्वितीय : साईराज सुहास साळगांवकर (विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी कॉलेज, तळेरे)
तृतीय : दिव्यता सीताराम मसुरकर (बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ले)
चतुर्थ : अक्षता धर्मेंद्र मोंडकर (स. ह. केळकर महाविद्यालय, वेंगुर्ले)

या स्पर्धेला जिल्हाभरातून भरघोस प्रतिसाद मिळाला. परीक्षक म्हणून रामचंद्र कुबल, महादेव बागडे, सायली परब यांनी काम पाहिले. 

स्पर्धेचे पारितोषिक वितरण ‘कोमसाप’च्या मालवण शाखेचे खजिनदार अजय मुणगेकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि मालवणी कवी रुजारिओ पिंटो यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या वेळी ‘वक्तृत्वकला : तंत्र आणि मंत्र’ या विषयावर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मालवण शाखेचे अध्यक्ष प्रकाश कुशे, मालवणच्या नाथ पै सेवांगणचे सचिव लक्ष्मीकांत खोबरेकर, मालवण नगर वाचनालयाचे प्रमुख ग्रंथपाल संजय शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर व्याख्याने केली. 

स्पर्धकांच्या वतीने प्रणिता कोटकर, गौरी मेस्त्री, अनघा पंडित यांनी आपले विचार मांडले. या वेळी विजय चौकेकर, बाबाजी भिसळे, रवींद्र मुणगेकर, कामिनी ढेकणे, भावना मुणगेकर, योगेश मुणगेकर, छाया आजगावकर, नेत्रा मालवणकर, अनिरुद्ध आचरेकर, सुरेश गावकर आदी साने गुरुजी कथामालेचे, ‘कोमसाप’चे कार्यकर्ते, तसेच स्पर्धेचे प्रमुख संयोजक सुरेश ठाकूर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुनाथ ताम्हणकर यांनी, तर आभारप्रदर्शन परशुराम गुरव यांनी केले.

(स्पर्धेत प्रथम आलेल्या प्रणिता कोटकर हिच्या भाषणाची झलक पाहा सोबतच्या व्हिडिओत..)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search