Next
लहानग्यांची पवारांना कागदी पिशव्यांची भेट
प्रेस रिलीज
Friday, April 06 | 02:43 PM
15 0 0
Share this story

आमीर साजन आणि सिद्धांत गायकवाड या मुलांनी केलेल्या कागदी पिशव्या कौतुकाने पाहताना अजित पवार.कोल्हापूर : प्लास्टिक वापरामुळे पर्यावरणावर परिणाम होत असल्याने कोल्हापूरमधील दोन लहानग्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना कागदी पिशव्या भेट देवून पर्यावरण रक्षणासाठी हाक दिली. लहानग्यांनी आणलेल्या कागदी पिशव्या त्यांनी चक्क पैसे देवून खरेदी करत त्यांना प्रोत्साहन दिले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनासाठी पवार  कोल्हापूर दौऱ्यावर असून, नेसरी येथील जाहीर सभा आटोपून कोल्हापूरमधील शासकीय विश्रामगृहामध्ये दुपारी आले असताना आमीर साजन आणि सिद्धांत गायकवाड या लहानग्यांनी पवारांची भेट घेत त्यांनी बनवलेल्या कागदी पिशव्या दिल्या. कागदी पिशव्या देताना या लहानग्यांनी पर्यावरण वाचण्यास मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले. पवार यांनी त्या लहानग्यांच्या कामाचे कौतुक केलेच शिवाय त्यांनी कागदी पिशव्या कशा बनवल्या आणि कुणी प्रोत्साहन दिले याची कौतुकाने चौकशीही केली.

त्या लहानग्यांनी कागदी पिशव्या पवार यांना कमी किंमतीत देण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांच्या श्रमाचे मोल लक्षात घेत पवार यांनी त्यांना जास्त पैसे देत त्या पिशव्या विकत घेतल्या आणि त्या दोन लहानग्यांचे विशेष कौतुकही केले. या वेळी त्यांच्यासमवेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, आमदार प्रकाश गजभिये उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link