Next
‘श्यामरंग’मध्ये शास्त्रीय-सुगम गायनाची जुगलबंदी
सप्तसुरांच्या मैफलीला सप्तरंगांचा साज
प्रेस रिलीज
Monday, September 03, 2018 | 02:31 PM
15 0 0
Share this story

श्यामरंग' कार्यक्रमात गायिका मेघना भावे-देसाई यांच्या सुरांवर  चित्रकार अनिता सावंत-देशपांडे यांनी चित्रे साकारली.

पुणे : ‘मोगरा फुलला, सुंदर ते ध्यान उभा विटेवरी..., सहेला रे..., मोरा पिया मोसे बोलत नाही.., हे सुरांनो चंद्र व्हा... हमे तुमसे प्यार कितना... अशा ‘एकसे एक बढकर’ राग, गीत, अभंग, भावगीतातून रविवारची सकाळ सप्तसुरांनी न्हाऊन गेली. दुपारी गायलेल्या मालकंस रागातील बंदिशी अन अजरामर गीते यांची रंगलेली जुगलबंदी आणि त्याच्या जोडीला स्वरांचा मागोवा घेत कृष्णलीलेवर रेखाटलेली चित्रे यामुळे सप्तसुरांच्या मैफलीला सप्तरंगांचा साज चढला.

कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने पुण्यातील डीडी क्लब आयोजित 'श्यामरंग' कार्यक्रमात पुणेकर रसिकांनी शास्त्रीय-सुगमच्या मिलाफाची अनोखी मैफल अनुभवली. गानसरस्वती किशोरीताई अमोणकरांचा वरदहस्त लाभलेल्या मुंबईतील सुप्रसिद्ध गायिका मेघना भावे-देसाई यांच्या सुरेल आवाजाने रसिकांची दाद मिळवतानाच त्यावर आधारित पेंटिंग्सचे प्रात्यक्षिक दाखवत पुण्यातील चित्रकार अनिता सावंत-देशपांडे यांनी उपस्थितांची वाहवा मिळवली. प्रशांत पांडव (तबला), निनाद सोलापूरकर (सिंथेसायझर व गायन), उदय शहापूरकर (हार्मोनियम), निलेश देशपांडे (बासरी), नरेंद्र काळे (तालवाद्य) यांनी साथसांगत केली.

मेघना भावे-देसाई
गोरख कल्याण रागातील मोगरा फुलाला, यमन रागातील सुंदर ते ध्यान, भूप रागातील सहेला रे, दरबारी कानडा रागातील तोरा मन दर्पण केहलाये, चारुकेशी रागातील हे सुरांनो चंद्र व्हा, ललत रागातील मैं गुलाम हूँ, सारंग रागातील घन घन माला, किरवानी रागातील का करूं सजनी, मालकंस रागातील आई सूर के पंछी आये व भैरवी रागातील मेरा कूछ सामान व हमे तुमसे प्यार कितना या सदाबहार गाण्यांनी रसिकांची मने जिंकली. मध्येच रंगलेली वाद्यांची जुगलबंदी, लावणीचा ठेका, गझल, ठुमरी, लोकगीत यामुळे 'श्यामरंग' उत्तरोत्तर रंगत गेला.

निवेदक धनंजय देशपांडे यांनी मेघना भावे-देसाई यांच्याशी संवाद करीत बारा राग, प्रहर, त्याचे महत्व, स्वरूप रसिकांना उलगडून दाखवले. शास्त्रीय संगीत आणि चित्रपटसृष्टी यातील गमतीजमती दोघांनीही सांगितल्या. ‘सवाई’त गाणं अन् गाण्यात ‘सवाई’ संकल्पनेवर आधारित शास्त्रीय आणि सुगम संगीताच्या रसिकांना एकत्रित मेजवानी देण्याचा प्रयत्न होता. या वेळी अभिनेते मिलिंद दास्ताने, अंबरीश देगलूरकर, विष्णू मनोहर, गायक मंगेश बोरगावकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link