Next
येस बँकेची महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीशी भागीदारी
प्रेस रिलीज
Wednesday, July 04, 2018 | 01:22 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : खासगी क्षेत्रातील चौथ्या क्रमांकाची बँक असलेल्या येस बँकेने स्टार्ट-अप कंपन्यांना आर्थिक पाठबळ  देण्याकरीता महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी (एमएसआयएनएस) या संस्थेशी करार केला आहे. एमएसआयएनएस ही संस्था महाराष्ट्र राज्यातर्फे स्टार्ट-अप्सना प्रोत्साहन देण्यासाठी उभारण्यात आली आहे. गेल्या २५ ते २९ जून या कालावधीत महाराष्ट्र स्टार्ट-अप सप्ताह आयोजित करण्यात आला होता. त्या काळात नोंदविण्यात आलेल्या स्टार्ट-अप कंपन्यांना बँकिंग सेवा पुरवण्याचा येस बँकेचा हा करार आहे.   

‘एमएसआयएनएस’शी झालेल्या कराराबद्दल बोलताना येस बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी राणा कपूर म्हणाले, ‘सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग, तसेच स्टार्ट-अप कंपन्या या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. या कंपन्यांची वाढ होण्यासाठी त्यांना सहाय्य करणे हे येस बँकेने कर्तव्य मानले आहे. या कंपन्यांना एकाच ठिकाणी बँकेशी संबंधित सर्व सेवा मिळाव्यात, असे आमचे प्रयत्न आहेत. स्टार्ट-अप सप्ताहाचे आयोजन करून महाराष्ट्र सरकारने व महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोयायटीने मोठी कामगिरी केली आहे. त्यांच्या या कार्यात सहभागी होण्याची संधी आम्हाला येस-हेड-स्टार्ट-अप या योजनेच्या माध्यमातून मिळाली, याचे आम्हाला समाधान आहे.’ 

महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोयायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी इ. रविंद्रन म्हणाले, ‘उद्योजकता वाढीसाठी, त्यासाठीचे वातावरण निर्माण होण्याकरीता दरवर्षीप्रमाणे आम्ही महाराष्ट्र स्टार्ट-अप सप्ताह आयोजित केला. समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी विविध कल्पकता व नावीन्य यांना या उपक्रमातून उत्तेजन दिले जाते. स्टार्ट-अप उद्योगांनी नाविन्यपूर्ण उत्पादने काढावीत, अशी सरकारची इच्छा आहे. ती उत्पादने योग्य वाटल्यास खरेदी करण्यातही आमचा पुढाकार असेल. येस बँकेशी भागिदीरी करण्याने स्टार्ट-अप्सना बँकिंगच्या चांगल्या सुविधा मिळतील व त्यांच्या व्यवहारांमध्ये सुकरता येईल, असा विश्वानस वाटतो.’ 

किमान आवश्यक शिल्लक रकमेची अट नसलेले विशेष चालू खाते, एपीआय बँकिंग, यूपीआय, वॉलेट सेवा यांसारख्या डिजिटल व कॅश व्यवस्थापनाच्या सुविधा,परकीय चलनविषयक विविध सुविधा आणि व्यवसायासंबंधी सल्ला देणारी सेवा, नियमित बँकिंग सेवेव्यतिरिक्त व्यवसायातील गुंतवणूक, व्यवसायाचे पालकत्व याविषयी मार्गदर्शन, व्यापारी गाळ्यांमध्ये सवलतींच्या दरांत जागा मिळवून देणे, अर्थ व कर यांविषयी सल्ला, समान स्वरुपाचा व्यवसाय करणार्याे इतर व्यावसायिकांशी भागिदारी करण्याविषयी मदत करणे, व्यवसाय व व्यक्तिगत स्वरुपाची कर्जे मिळण्याची सुविधा ही बँकेच्या योजनेची खास वैशिष्ट्ये आहेत.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search