Next
‘मानव उत्थान’तर्फे प्रदूषणाविरोधात उच्च न्यायालयाला पत्र
BOI
Tuesday, April 30, 2019 | 01:11 PM
15 0 0
Share this article:

पर्यावरण अबाधित राहण्यासाठी नागरिकांकडून पत्र लिहून घेताना मानव उत्थान मंचाचे कार्यकर्ते.नाशिक रोड : नाशिकमध्ये प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढले असून, नागरिकांना व प्राणीमात्रांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या कंपन्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी नाशिक रोडच्या मानव उत्थान मंचच्या माध्यमातून शंभर नागरिकांनी उच्च न्यायालयाला पत्रे लिहिली आहेत. नाशिक शहरासह नाशिक जिल्ह्यातील पर्यावरण धोक्यात आल्याने पर्यावरणप्रेमींकडून जनजागृतीसह कायदेशीर मार्गाचा अवलंब केला जात आहे. 

जगबीर सिंग, कुलदीप कौर, सुनीता तोरणहाळी, मनीष बाविस्कर, ऋषिका चंदा, कीर्ती गायकवाड, अरविंद निकम आदी या मोहिमेत सहभागी झाले आहेत. देशातील प्रदूषित शहरांची यादी नुकतीच जाहीर झाली. त्यात नाशिकचा राज्यात सहावा, तर देशात ५०वा क्रमांक आहे. देशात दर वर्षी एक लाख मुलांचा प्रदूषणामुळे मृत्यू होतो, असा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. 

सातपूर, अंबड एमआयडीसीतील नामवंत उद्योग कंपन्यांतून योग्य ती खबरदारी न घेतल्याने मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे. त्यांच्याविरुद्ध कारवाईसाठी मानव उत्थान मंचने जिल्हाधिकारी, महापालिका, पोलीस आयुक्त, प्रदूषण नियंत्रण मंडळ आदींकडे निवदेन दिली, आंदोलने केली; मात्र कारवाई होत नसल्याने अखेर उच्च न्यायालयाला पत्रे लिहिण्यात आली. सातपूर आयटीआय चौकातील जिल्हा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयापुढे ही मोहीम राबविण्यात आली. प्रदूषित वाहनांविरुद्धही कारवाईची मागणी यात केली आहे. 

या विषयी माहिती देताना जगबीर सिंग म्हणाले, ‘प्रत्येक नागरिकाला स्वच्छ श्वास घेण्याचा अधिकार आहे. सातपूर व अंबड एमआयडीसीतील कारखाने व कंपन्यांविरुद्ध  कारवाईची मागणी करूनही ती होत नसल्याने उच्च न्यायालयाला पत्रे लिहिण्यात आली. प्रदूषण मंडळ बरखास्त करावे, अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात येणार आहे. कारवाई न करणाऱ्या अन्य प्रशासकीय विभागांविरुद्धही कारवाईची मागणी उच्च न्यायालयाकडे केली जाणार आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Pramod pawar About 171 Days ago
Very good work jasbir sir Aap apna time de rahe hai ye nashik ke logoke liye bahut badi bat hai Abhi nashik ke logoke aware hi parega
0
0

Select Language
Share Link
 
Search