Next
शेतकरी सन्मान योजनेसाठी तात्काळ अर्ज करण्याचे आवाहन
BOI
Monday, June 17, 2019 | 02:49 PM
15 0 0
Share this article:

सोलापूर : ‘पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली असून, नव्या नियमानुसार या योजनेचा लाभ दोन हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र असलेल्या ८१ गावांतील १२ हजार ५९ शेतकऱ्यांला मिळणार आहे. यासाठीचे अर्ज तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सहायकांकडे भरून तातडीने जमा करावेत,’ असे आवाहन मंगळवेढ्याचे तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी केले.

यापूर्वी या योजनेमध्ये दोन हेक्टरच्या आतील शेतकऱ्यांचा समावेश होता. यात या शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये अनुदान स्वरूपात दिले जाणार आहेत; मात्र दोन हेक्‍टरपेक्षा अधिक क्षेत्र असलेले शेतकरी या योजनेपासून वंचित राहत होते. ही बाब लक्षात घेऊन या वर्षीच्या अर्थसंकल्पात या योजनेत सर्वच शेतकऱ्यांना सामावून घेतल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे या नव्या निर्णयामुळे तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचा योजनेत समावेश होणार असल्यामुळे अल्पभूधारक असलेल्या ३७ हजार ७८६ हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

सुधारीत योजनेसाठी शेतकऱ्यांनी आपल्या गावातील तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सहायक यांच्याकडे आधार कार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स, अर्ज भरून सोबत जोडून तो तात्काळ जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये कुटुंबांमध्ये पती-पत्नी आणि अठरा वर्षांच्या आतील मुलांचा एकच अर्ज सादर करायचा आहे. १८ वर्षांपेक्षा वर जास्त वय असलेली मुले असतील आणि त्यांच्या नावे जमीन असेल, तर त्यांनी वेगळा अर्ज सादर करायचा असल्याची माहिती रावडे यांनी दिली. 

महसूल प्रशासनाने यंदा या योजनेची शेतकऱ्यांसाठी माहिती पोहोचवली आहे. महसूल प्रशासनाकडे रिक्त पद असल्यामुळे तलाठी सोबतीला कृषी सहायक व ग्रामसेवकांची मदत घेऊन या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे नियोजन केले आहे. यामध्ये गाव कामगार तलाठी यांच्याकडे ब्रह्मपुरी, माचणूर, पाटकळ, डोणज, चिक्कलगी, हिवरगाव, खोमनाळ, डिकसळ, लेंडवेचिंचाळे, नंदेश्वर, भोसे, लोणार, शिरनांदगी, मारोळी, बोराळे, कर्जाळ, कात्राळ, मुंडेवाडी, तर ग्रामसेवकांनी उचेठाण, तामदर्डी, भालेवाडी, कचरेवाडी, मरवडे, तळसंगी, भाळवणी, आसबेवाडी, खवे, जित्ती आंधळगाव, खडकी, जुनोनी, जालिहाळ, रेवेवाडी, पडोळकरवाडी, रड्डे, महमदाबाद (हु) सिद्धापूर, तांडोर, अरळी, लमाण तांडा शिवणगी या गावांतील आणि कृषी सहायकांनी बठाण, रहाटेवाडी, गणेशवाणी, मेटकरवाडी, डोंगरगाव, निंबोणी, येड्राव, शिरसी, हाजापूर, गोणेवाडी, खुपसंगी, हुन्नर, मानेवाडी, सिद्धनकेरी, नंदुर, येळगी, हुलजंती महमदाबाद (शे) आदी गावांतील शेतकऱ्यांकडून अर्ज घेण्याचे आवाहन केले आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search