Next
औंध येथे ‘कथा यशस्वी उद्योजकांच्या’वर मार्गदर्शन
प्रेस रिलीज
Tuesday, December 18, 2018 | 02:37 PM
15 0 0
Share this article:



औंध : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या उद्योजकता विकास विभागामार्फत ‘कथा यशस्वी उद्योजकांच्या’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यात उद्योजकता विकास क्षेत्रात परीक्षक म्हणून दीर्घ काळ कार्यरत असणारे अरविंद पित्रे यांनी मार्गदर्शन केले.

ते म्हणाले, ‘उद्योजक हा रोजगार शोधणारा नसतो, तर तो रोजगार निर्माण करणारा असतो. आजच्या युगात विविध व्यवसायात उद्योजकतेच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. भांडवल, मनुष्यबळ, कच्चामाल, मशिनरी यांचा योग्य मेळ घालून कल्पनेने आकर्षक नाविन्यपूर्ण उत्पादकाचे नाव निर्माण करणारा व्यक्ती उद्योजक होतो.’



विशेष शारीरिक क्षमता असणाऱ्या अनेक व्यक्ती उद्योग क्षेत्रात यश मिळवत असल्याची अनेक उदाहरणे देत पित्रे यांनी विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकांप्रमाणेच महत्त्वाकांक्षा आणि प्रेरणा निर्माण करत मार्गदर्शन केले.

महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुश्री बोबडे म्हणाल्या, ‘प्रथमतः आपल्या मनात यायला हवे की आपण उद्योजक व्हावे याचसाठी हे व्याख्यान आयोजित केले होते. या व्याख्यानाच्या माध्यमातून एखादा यशस्वी उद्योजक निर्माण होऊ शकेल, असा आमचा विश्वास आहे.’

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांची ओळख प्रा. नलिनी पाचर्णे यांनी करून दिली. डॉ. हर्षद जाधव यांनी आभार मानले. या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. विलास सदाफळ, प्रा. मयुर माळी, प्रा. कुशल पाखले आदी मान्यवर उपस्थित होते.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Atul Choure About 212 Days ago
अप्रतिम सुंदर....
0
0

Select Language
Share Link
 
Search