Next
भिडे कार्यशाळेत हर्षयामिनी निवास प्रकल्पाचे आयोजन
BOI
Thursday, December 06, 2018 | 12:51 PM
15 0 0
Share this story

श्यामराव भिडे कार्यशाळेत आयोजित हर्षयामिनी या निवास प्रकल्पादरम्यान जादूचे खेळ दाखवताना जादूगार विनयराज उपरकर.

रत्नागिरी : आविष्कार संस्थेच्या श्यामराव भिडे कार्यशाळेत हर्षयामिनी हा निवास प्रकल्प राबविण्यात आला. यात ‘जादू की दुनिया मॅजिका’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जादूगार विनयराज उपरकर यांनी आपल्या जादुई कौशल्याने कार्यशाळेचे विद्यार्थी, पालक आणि मान्यवरांवर जादू केली. विद्यार्थ्यांनी चांदण्या रात्री सहभोजनाचा आस्वाद घेतला. यासाठी हर्षा हॉटेलचे कौस्तुभ सावंत यांचे विशेष सहकार्य लाभले.

त्यानंतर विद्यार्थ्यांनी कर्मचाऱ्यांसोबत चांदण्या रात्री मजा-मस्ती, गाणी म्हणत परिसरात सामूहिक फेरफटका मारण्याचा अनुभव घेतला. मध्यरात्री कराओके सुरभी हा कार्यक्रम झाला. यासाठी मंगेश सावंत व गौरांग वायंगणकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाध्ये स्वत: विद्यार्थ्यांनी उत्साहित होऊन कराओकेच्या ट्रॅकवर ‘प्रथम तुला वंदितो’, ‘ऐ मेरे वतन के लोगो’ यांसारखी गाणी सादर केली. यामध्ये कर्मचारीही विद्यार्थ्यांसोबत सहभागी झाले. या कार्यक्रमादरम्यान नोव्हेंबर महिन्यात या विद्यार्थ्यांचे व कर्मचाऱ्यांचे वाढदिवस होते त्यांना विद्यार्थ्यांनी बनविलेली भेटवस्तू देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.

कराओकेच्या ट्रॅकवर गाणे सादर करताना विद्यार्थिनी

हर्षयामिनी निवास प्रकल्पामध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. बामणे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी डॉ. यतीन पुजारी, संस्था माजी अध्यक्ष डॉ. शरद प्रभुदेसाई, प्रतिभा प्रभुदेसाई, संस्था सदस्य मानसशास्त्रज्ञ सचिन सारोळकर, सविता कामत विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका वैशाली जोशी, संस्था सदस्या पद्मजा बापट, प्रा. अनुजा घारपुरे, आकांक्षा वायंगणकर, विनोद वायंगणकर, सविता कामत विद्यामंदिरचे कर्मचारी, पालक, हितचिंतक सहभागी झाले होते.

दैनंदिन कामकाजाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांचे वर्तन, निरीक्षण, कुटुंबापासून लांब जाऊन मित्रपरिवारात एकत्रित राहण्याचा अनुभव, या दरम्यानचे समायोजन, स्वत:च्या वस्तूंची काळजी घेणे, स्वत:ची औषधे वेळच्या वेळी घेणे अशा स्वावलंबन कौशल्यांचे निरीक्षण केले गेले. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळाला; तसेच मोठ्या उत्साहात ते मनोरंजन व कार्यक्रमात सहभागी झाले. कार्यक्रमात स्वत:हून तयारी करायला मदत केली, मित्रपरिवाराशी जुळवून घेतले आणि वर्तन समस्या निरीक्षण आणि नियंत्रण असे अनेक उद्देश यातून सफल झाले. 

निवास प्रकल्पादरम्यान (कै.) फिरोज सावंत स्मृतिप्रीत्यर्थ समीर सावंत, गणेश फर्निचरचे पटेल यांनी खाऊ दिला. कार्यशाळा व्यवस्थापकीय अधीक्षक सचिन वायंगणकर यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link