Next
ठाण्यात ‘शाहिरी लोककले’चा जल्लोष
प्रेस रिलीज
Friday, March 09, 2018 | 05:48 PM
15 0 0
Share this article:

प्रातिनिधिक फोटोठाणे : कला, साहित्य, संस्कृती आदी क्षेत्रात लोक प्रबोधनात्मक सामाजिक कार्य करणाऱ्या ठाण्यातील महाराष्ट्र लोककलावंत प्रतिष्ठानतर्फे अकरावा वर्धापन दिन सोहळा आणि ‘महाराष्ट्र शाहिरी लोककला महोत्सव २०१८’चे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम ११ मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता कोपरी (पूर्व) ठाणे येथील संत तुकाराम महाराज मैदानावर होणार आहे. या महोत्सवामध्ये महाराष्ट्रातील नामवंत शाहिरांचे पोवाडे, लोकगीते, लावणी, लोकनृत्ये व कोळीनृत्ये याद्वारे लोककलेचा भव्य कार्यक्रम होणार असून, यामध्ये अभिनेते स्वप्नील जोशी, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, प्रशांत दामले, जयवंत वाडकर, सिने दिग्दर्शक रवी जाधव, लावणी सम्राज्ञी माया जाधव, उदय साटम, यांसह इतर नामवंत कलाकारांचा सहभाग असणार आहे.

या कार्यक्रमात प्रतिष्ठानतर्फे कला क्षेत्रातील १२ मान्यवरांना महाराष्ट्र लोक गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रधार सिनेस्टार विनोद नाखवा, तर प्रमुख पाहुणे ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आहेत. या वेळी खासदार राजन विचारे, माजी आमदार आणि शिवसेना उपनेते अनंत तरे, आमदार रवींद्र फाटक, ठाणे महापालिकेच्या महापौर मिनाक्षी शिंदे, उप महापौर रमाकांत मढवी, कल्याणचे शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, ठाणे महापालिकेचे सभागृह नेते नरेश म्हस्के, शिवसेना विभागप्रमुख  गिरीश राजे, नगरसेवक नरेश मणेरा, नगरसेविका मालती पाटील, नम्रता पमनानी, शर्मिला गायकवाड, नगरसेवक भरत चव्हाण, दै. जनादेशचे संपादक कैलाश म्हापदी, माजी दूरदर्शन निर्माते (कामगार विश्व) सुरेश राणे, माजी दूरदर्शन निर्माते विनायक चासकर, निवृत्त तुरुंगाधिकारी शंकर गुजर आदी उपस्थित राहणार आहेत.

समस्त कलाप्रेमी नागरिकांनी या महोत्सवाला उपस्थित राहाण्याचे आवाहन महाराष्ट्र लोककलावंत प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मधुसूदन सुगदरे यांनी केले आहे.

कार्यक्रमाविषयी :
दिवस : रविवार, ११ मार्च २०१८
वेळ : सायंकाळी पाच वाजता संत
स्थळ : तुकाराम महाराज मैदान, कोपरी (पूर्व) ठाणे ४००६०३.
संपर्क : ९२२४० ८०१४८
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search