Next
क्रेआ विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांसाठी ‘इंटरवोव्हन लर्निंग’
प्रेस रिलीज
Friday, July 20, 2018 | 02:51 PM
15 0 0
Share this story

आंध्र प्रदेश : येथील क्रेआ विद्यापीठ हे ‘इंटरवोव्हन लर्निंग’ (आंतरशाखीय अभ्यास) संकल्पनेचे आद्यप्रवर्तक असून, यात सृजनत्मकता आणि कृती, कला आणि विज्ञान, मीमांसा आणि व्यवहार्यता, पूर्व आणि पश्चिम विचारसरणी यांची गुंफण, तसेच भूतकाळापासून दिलेली शिकवण भविष्यकाळाची सज्जता याचा मिलाफ साधण्यात आला आहे. विविध कॉर्पोरेट्स, स्वयंसेवी संस्था आणि संशोधन संस्थांच्या प्रस्तावित भागीदारीच्या माध्यमातून वास्तविक जगाशी संबंधित प्रकल्पांतून दिले जाणारे शिक्षण विद्यार्थ्यांना आव्हाने आणि संधींना सामोरे जाण्याचा समग्र अनुभव देणार आहे.

आंध्र प्रदेशच्या श्री सिटी येथील ४० एकरवरील आयएफएमआर कॅंपसमध्ये क्रेआ विद्यापीठ २०१९च्या पहिल्या बॅचची सुरुवात करणार आहे. चेन्नईपासून ६५ किलोमीटर अंतरावर असलेल्या श्री सिटीमध्ये ‘क्रेआ’च्या प्रस्तावित २०० एकरांवर पर्यावरणस्नेही निवासी कॅंपस असेल, जिथे निवासी शिक्षणाचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळेल. एकविसाव्या शतकातील अभिनव आव्हाने आणि संधी स्वीकारण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना सज्ज करणे, हे क्रेआ विद्यापीठाचे उद्दीष्ट आहे.

मान्यवरांचे कार्यकारी आणि शैक्षणिक मंडळ असलेले हे विद्यापीठ आपल्या कार्यक्रमांमध्ये सर्वाधिक शैक्षणिक काटेकोरपणा आणि नैतिक मानांकनांवर सर्वाधिक भर देते. जगात नैतिकदृष्ट्या अनुकूल, उत्प्रेरक प्रभाव पाडण्याचे शिक्षण उच्च क्षमता असलेल्या व्यक्तींना देणे, हे या विद्यापीठाचे ध्येय आहे.

रघुराम राजन, एन. वाघुल, आर. सेषशायी, सुंदर रामस्वामी, कपिल विश्वनाथन, अनू आगा, मंजुळ भार्गव, विशाखा देसाई, जॉन एचमेंडी, धीरज हिंदुजा, सज्जन जिंदाल, आनंद महिंद्रा, किरण मझुमदार शॉ, श्रीनिवास राजू, एस. रामादुराई आणि सिरील श्रॉफ हे मान्यवर कार्यकारी मंडळावर आहेत, तर सुंदर रामस्वामी, मंजुल भार्गव, विशाखा देसाई, जॉन एचमेंडी, आकाश कपूर, टीएम कृष्णा, श्रीनाथ राघवन, गौरव रैना, रघुराम राजन, जेसिका सेडन आणि तारा थेगराजन यांसारख्या मान्यवर शिक्षणतज्ज्ञांचा शिक्षण मंडळात समावेश आहे.

विद्यापीठाने लिबरल आर्ट्स आणि विज्ञानामध्ये चार वर्षांचा निवासी पदवीपूर्व अभ्यासक्रम (यूजीसीच्या परवानगीची प्रतीक्षा) तयार केला असून, त्याद्वारे बीए (ऑनर्स) आणि बीएससी (ऑनर्स) पदवी दिली जाईल. अनिवार्य बहुआयामी मूलभूतता आणि कौशल्यावर आधारित अभ्यासक्राद्वारे पाया भक्कम झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार वैकल्पिक निवड करता येईल. ‘क्रेआ’च्या पदवीधारकांना पदव्युत्तर पदवीसह कॉर्पोरेट्स, शासकीय, स्वयंसेवी संघटना, संशोधन संस्था आणि आंत्रप्रेन्युअरशिप असे करिअरचे बहुविध पर्याय उपलब्ध असतील. समग्र आणि कडक प्रवेशनिकषांच्या आधारे क्रेआ विद्यापीठ उच्च क्षमतेच्या विद्यार्थ्यांची निवड करेल आणि आवश्यकतेनुसार मूल्यांकन केल्यानंतर आर्थिक साहाय्याचा विचार करेल.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link