Next
रॉयल हाइट्स सोसायटीमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प
BOI
Tuesday, November 27, 2018 | 12:45 PM
15 0 0
Share this article:

रॉयल हाईटस् को-ऑप हाऊसिंग सोसायटीमधील सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन करताना खासदार अनिल शिरोळे, महापौर मुक्ता टिळक आणि सोसायटीचे सदस्य.

पुणे : सौरऊर्जेचे महत्त्व ओळखून, पर्यावरण रक्षणासाठी सजग असणाऱ्या बोपोडी येथील रॉयल हाइट्स को-ऑप हाऊसिंग सोसायटीच्या सदस्यांनी स्वत: पुढाकार घेत आपल्या सोसायटीमध्ये ३२ किलोवॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केला आहे. या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन  खासदार अनिल शिरोळे आणि महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते करण्यात आले.      

या वेळी नगरसेवक विजय शेवाळे, नगरसेवक प्रकाश ढोरे, नगरसेविका सुनिता वाडेकर, सोसायटीचे अध्यक्ष पी. वर्गीस, सचिव राजेंद्रसिंह सोही, खजिनदार सदानंद घोडगेरीकर व सोसायटीमधील इतर सभासद उपस्थित होते. रॉयल हाइट्स को-ऑप हाऊसिंग सोसायटीने उभारलेल्या ३२ किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पामुळे दर महिन्याला चार हजार युनिट वीज निर्मिती होणार असून, दर महिन्याला अंदाजे ६० ते ७० हजार रुपयांची बचत होणार आहे.


या वेळी बोलताना अनिल शिरोळे म्हणाले, ‘हवामानबदल हे आज आपल्या समोरील मोठे संकट आहे. या संकटाचा सामाना करण्यासाठी हरित ऊर्जेची निर्मिती करीत शाश्वत विकास करणे गरजेचे आहे. यामध्ये जनतेचा सहभाग सर्वाधिक महत्त्वाचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हेच लक्षात घेत, जगातला सर्वात मोठा नवीकरणीय ऊर्जा विस्तार कार्यक्रम सुरू केला आहे. या अंतर्गत भारत सरकार २०२२ पर्यंत १७५ गिगावॅट वीज निर्मिती करणार आहे. त्यापैकी १०० गिगावॅट वीज निर्मिती ही सौर ऊर्जेपासून होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी  आपापल्या पद्धतीने सहभागी होत २०२२ पर्यंत देश प्रदूषणमुक्त करण्यास मदत करावी. रॉयल हाइट्स को-ऑप हाऊसिंग सोसायटीच्या सदस्यांनी घेतलेल्या या पुढाकाराबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि अभिनंदन करतो.’       
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search