Next
क्रिकेट स्पर्धेत ‘एमसीई’ महाविद्यालयाला जेतेपद
प्रेस रिलीज
Tuesday, December 19 | 12:58 PM
15 0 0
Share this story

पुणे : वरिष्ठ गट आंतरमहाविद्यालयीन ​क्रिकेट स्पर्धेत एमसीई सोसायटी महाविद्यालयाने विजेतेपद पटकाविले. अंतिम सामन्यांत एमसीईएस वरिष्ठ महाविद्यालयाने एमएमसीसी महाविद्यालयाचा चार गडी राखून पराभव केला.

महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार, उपाध्यक्षा आबेदा इनामदार, एमसीई सोसायटीचे सचिव लतिफ मगदूम, आझम स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीचे संचालक गुलजार शेख यांसह सर्व कार्यकारिणी सदस्यांनी अभिनंदन केले.

प्रथम फलदांजी करताना एमएमसीसी महाविद्यालयाने ४० षटकांत नऊ गडी बाद २२३ धावा केल्या. पारस गवली व विनय पाटील यांनी प्रत्येकी ६८ धावा केल्या. अभिमन्यू याने ४१ धावा करून साथ दिली. दानिश पटेल याने चार गडी बाद केले. त्यास प्रत्युत्तर देताना एमसीईएस वरिष्ठ महाविद्यालयाने ३९.५ षटकांमध्ये सहा गडी गमावून २२४ धावा करून विजय मिळविला. विजयी संघाकडून झैद पटेल याने सर्वाधिक 53 धावा केल्या. झैद अन्सारी याने ४२, तर दानिश पटेल याने ४० धावा करून साथ दिली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link