Next
‘अशोक जगदाळे ‘राष्ट्रवादी’ पुरस्कृत उमेदवार’
प्रेस रिलीज
Wednesday, May 09 | 05:12 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘लातूर-उस्मानाबाद-बीड विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी पक्षाचे नेते अशोक जगदाळे हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीचे पुरस्कृत उमेदवार असतील,’ अशी माहिती पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.

‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार रमेश कराड यांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीतून उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने त्याचीच चर्चा होती; परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अशोक जगदाळे हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवतील,’ असे मलिक यांनी स्पष्ट केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link