Next
‘सीएम चषक खेळातील क्रांतीचा नवीन इतिहास रचेल’
प्रेस रिलीज
Saturday, November 03, 2018 | 12:58 PM
15 0 0
Share this article:अटल क्रीडा नगरी (पुणे) : ‘महाराष्ट्रातल्या क्रीडा प्रतिभेला शोधून त्यांना मोठा मंच देण्याच्या दिशेने सीएम चषक नवीन अध्याय लिहील; तसेच युवा पिढीत संघटन, सह अस्तित्व आणि सहकाराचा भाव निर्माण करण्याच्या दिशेनेसुद्धा हे आयोजन लक्षणीय ठरेल,’ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे येथे व्यक्त केला.

पुण्यातील हडपसर येथे आयोजित करण्यात आलेल्या सीएम चषक या राज्यव्यापी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा भव्य उद्घाटन सोहळा एक नोव्हेंबर २०१८ रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. राज्यातील सर्व जिल्ह्यांमधून आलेल्या खेळ ज्योतीच्या मशाली, रोषणाई, पुण्यातील १२४ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची उपस्थिती हे या उद्घाटन सोहळ्याचे विशेष आकर्षण होते.

युवा मोर्चाचे आमदार योगेश टिळेकर यांनी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सहकार मंत्री सुभाष देशमुख, सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, भाजपचे ज्येष्ठ आमदार मंगल प्रभात लोढ़ा, मेधा कुलकर्णी, माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, विजय काळे, जगदीश मुळीक व महापौर मुक्ता टिळक यांचे स्वागत केले.  फडणवीस म्हणाले, ‘अटल क्रीडा नगरीमध्ये सुरू होत असलेल्या या कार्यक्रमाद्वारे राज्याच्या खेळाच्या इतिहासात एक नवीन अध्याय लिहिला जाईल व महाराष्ट्रामध्ये क्रीडा क्रांतीला सुरुवात होईल. पुण्यातून सुरू झालेली क्रीडा क्रांतीची सुरुवात राज्यभरातील नवीन क्रीडा प्रतिभांना घडवण्यासाठी मदत करेल; तसेच युवा पिढीला काँप्युटरच्या खेळांमधून बाहेर काढून मैदानी खेळांकडे आणण्यासाठी ही स्पर्धा महत्त्वाची भूमिका बजावेल.’

पुणे शहरातील नागरिकांना सार्वजनिक वाहतूक सक्षम होण्याच्या दृष्टीने मेट्रो प्रकल्प राबविला जात असून, त्यातील एक टप्पा हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो आता हडपसरपर्यंत धावणार असल्याची घोषणा या वेळी  मुख्यमंत्र्यांनी केली. आमदार टिळेकर यांमी मला हड़पसरसाठी गळ घातली, त्यांना विनंतीला मान देऊन मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याच्या मार्ग घेतल्याचा फडणवीस यांनी सांगितले.

उद्घाटन कार्यक्रमाला सुमारे १० हजारांपेक्षा जास्त लोक उपस्थित होते. या प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रीय स्तरावर क्रीडा अर्जुन पुरस्कार व द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले व आकाशात तिरंगी फुगा सोडून मैदानात खेळाडूंमध्ये जाऊन खेळाला सुरुवात केली. महाराष्ट्र सरकारला चार वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पुण्यात सुरू झालेला हा समारंभ १२ जानेवारीपर्यंत चालणार असून, यात राज्यातील विविध जिल्ह्यांतून ५० लाख स्पर्धक सहभागी होणार आहेत.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search