Next
मोटरसायकल रेसिंगचा थरार पुण्यात
प्रेस रिलीज
Thursday, October 26 | 06:37 PM
15 0 0
Share this story

  प्रातिनिधिक फोटोपुणे :   ‘अवघ्या  १२-१३ वर्षांच्या वयाच्या मुलांनी शर्यतीच्या ट्रॅकवर मोटरसायकल लीलया चालवण्याचे कसब आत्मसात केले आहे. त्यांचे हे अनोखे कौशल्य पाहण्याची संधी येत्या १७ ते १९ नोव्हेंबर दरम्यान मोटरसायकल रेसिंग स्पर्धेदरम्यान  अनुभवता येणार आहे. विलो इव्हेन्ट्सने चौथ्या ‘पुणे इन्व्हिटेशनल सुपरक्रॉस लीग २०१७’चे  आयोजन केले असून मुंढवा येथील रॉयल पाम्स येथे या शर्यती होणार आहेत. यात  ३५ राष्ट्रीय आणि ११ आंतरराष्ट्रीय रायडर्स सहभागी होणार आहेत’, अशी माहिती नामांकित माजी आंतरराष्ट्रीय रायडर आणि व्हिलो इव्हेंट्सचे संयोजक ईशान लोखंडे यांनी दिली.  

‘युवराज कोंढे, करण कार्ले, इशान शानबाग, सार्थक चव्हाण या १२ वर्षांच्या मुलांसह  एकमेव महिला रायडर - तनिका शानबाग यांचा सहभाग हे या शर्यतीचे विशेष आकर्षण आहे ,तर  ऋग्वेद बारगुजे हा अष्टपैलू युवा रायडर पुण्याचे प्रतिनिधित्व करणार असून त्याला हरिथ नोह, व्ही. एस. नरेश आणि आर. नटराज सारखे निपुण रायडर्स लढत देणार आहेत,’ असेही लोखंडे यांनी सांगितले. 

‘दोन खुल्या गटातील डेमो - रायडर्स देखील सहभागी होणार  असून  भल्ला रॉयल, आय.एन.के. रेसिंग, पी.बी.रेसिंग, ग्रीश्म टीम आणि लिलेरिया मोटरस्पोर्ट्स या संघांनी या शर्यतींमधील त्यांचा सहभाग निश्चित केला आहे. या स्पर्धेचा ट्रॅक हा पूर्णपणे व्हिलो इव्हेन्ट्सच्या गटाने तयार केला आहे. या स्पर्धेतील सहभागी रायडर्स तीन दिवसात एकूण ६ मोटो-प्रकारांमध्ये सहभागी होतील. आंतरराष्ट्रीय रायडर्स आणि भारतातील नामांकित रायडर्स शर्यतीच्या ट्रॅकवर धमाकेदार लढत देतील. प्रत्येक राऊंडमधील कामगिरीनुसार टीम रायडर्सना पॉईंट्स मिळतील. प्रत्येक शर्यतीसाठी वेगळे पॉईंट्स देण्यात येणार असून सर्व शर्यतींचे एकत्रित पॉईंट्स या स्पर्धेचा विजेता ठरवतील. अशा प्रकारच्या स्वरूपामुळे सर्वच शर्यती अटीतटीच्या ठरणार आहेत. संघांचा लिलाव ३ नोव्हेंबरला होणार आहे.’, असे  त्यांनी नमूद केले.

या स्पर्धेदरम्यान दररोज दुपारी खुल्या मोटोक्रॉस शो, वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, प्रदर्शने, नवीन उत्पादनांचे वितरण, संगीत आणि विविध सुपरक्रॉस मॉडेल्स पहाण्याची संधी मिळणार आहे. अनेक सुप्रसिद्ध ब्रॅण्ड्स, कलाकार आणि रेसर्स येथे हजेरी लावतील. पुणे इन्व्हिटेशनल सुपरक्रॉस लीग ही भारताताली आतापर्यंतची सर्वात मोठी आणि आयपीएल प्रकारावर आधारित जगातील पहिलीच फ्रॅन्चायजी  सुपरक्रॉस शर्यत आहे. प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या या स्पर्धा भारतातील मोटोक्रॉस आणि सुपरक्रॉसचा चेहरा-मोहरा बदलणाऱ्या ठरतील’, असा विश्वास लोखंडे यांनी व्यक्त केला.

 
चांगले ट्रॅक्स, सोयी-सुविधा, विविध ब्रॅण्ड्सची उपलब्धता आणि सर्वात महत्वाचे म्हणजे रायडर्सना मिळायला हवा तो आदर - हे सर्वच पुणे इन्व्हिटेशनल सुपरक्रॉस लीग मिळवून देईल अशी  खात्री असल्याचे सांगत लोखंडे यांनी या स्पर्धा  फेडरेशन ऑफ मोटर स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया (FMSCI) यांच्या सहकार्याने आणि भारतीय व आंतरराष्ट्रीय नियमावलीचे पालन करून आयोजित केल्या गेल्या असल्याचेही त्यांनी  स्पष्ट केले.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link