Next
मुक्तांगण विज्ञान शोधिकेचा अत्याधुनिक ‘प्रोजेक्ट मंगलमूर्ती’
आधुनिक तंत्रज्ञानाचा अनोखा आविष्कार
BOI
Saturday, September 07, 2019 | 05:11 PM
15 0 0
Share this article:


पुणे : रोबोटिक्स आणि इतर तंत्राचा वापर करून भाविकांना प्रसाद देणारा उंदीरमामा, भाविक दर्शनाला समोर येताच वाजणारे संगीत, देवाला फुले वाहणारा रोबो अशा अनेक वैज्ञानिक करामती मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्रातील गणपतीबाप्पाच्या देखाव्यात साकारण्यात आल्या आहेत. हा ‘प्रोजेक्ट मंगलमूर्ती’ रविवार, आठ सप्टेंबरपासून दर्शनासाठी सर्वांना खुला होणार असून, १५ सप्टेंबरपर्यंत सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत हा देखावा पाहता येणार आहे.

रोबोटिक्स आणि इतर तंत्राचा वापर करून आकर्षक मखर, गणपती बाप्पा, उंदीरमामा साकारला आहे. त्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स, मायक्रो कंट्रोलर्स, पायथन प्रोग्रामिंग आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) आदी नवतंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. आधुनिक साधने आणि तंत्रज्ञान यांचा अनोखा मिलाफ येथे पाहायला मिळत आहे. बाप्पासमोर ‘उंदीरमामा २.०’ असून, जो येणाऱ्या प्रत्येक भक्ताला प्रसाद मिळण्याची काळजी घेतो. भक्तांनी दर्शन घेताच चॉकलेट मोदकाचा प्रसाद मिळतो. सेन्सरचा वापर करून फुलांची रचना करण्यात आली आहे. दर्शन घेण्यासाठी भक्त समोर येताच संगीत वाजते आणि रोबो देवाला फुले वाहतो. कागद आणि सर्वो मोटरसह तयार केलेली थ्रीडी मोशन आर्ट मोहक आकार निर्माण करण्यास सुरुवात करते.  

‘या प्रकल्पाच्या निमित्ताने विज्ञान शोधिका केंद्रात ‘टेक क्लब’ सुरू करण्यात येणार असून, त्याद्वारे विद्यार्थ्यांना नव्या तंत्रज्ञानाचे शिक्षण दिले जाणार आहे,’ अशी माहिती संस्थेच्या उपसंचालिका नेहा निरगुडकर यांनी दिली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search