Next
खासदार अनिल शिरोळे यांची जायका प्रकल्पासंदर्भात बैठक
प्रेस रिलीज
Thursday, December 21 | 12:27 PM
15 0 0
Share this story

खासदार अनिल शिरोळेपुणे : पुण्यातील मुळा मुठा नदी सुधारणेसंदर्भात अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या 'जायका' प्रकल्पाच्या संदर्भातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी खासदार अनिल शिरोळे यांची केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री  हर्षवर्धन यांच्यासोबत दिल्लीत एक बैठक झाली. भारत सरकारच्या NRCD (राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनालय) आणि जपान मधील JICA ( Japan International Corporation Agency) या संस्थांमार्फत प्रकल्प सल्लागार नेमण्याचे बैठकीत नक्की करण्यात आले. या निर्णयानुसार लंडनमधील मेसर्स पेल फ्रिचमन (लीड पार्टनर) यांची प्रकल्प सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली असून, त्यासंबंधीचे अधिकृत पत्र १५ डिसेंबर रोजी संबधित मंत्रालयाकडून जारी करण्यात आले आहे, अशी माहिती खासदार अनिल शिरोळे यांनी दिली. 

केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांचे आभार मानून “सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे जायका प्रकल्पाची अंमलबजावणी तातडीने पूर्ण होईल,” असा विश्वास शिरोळे यांनी व्यक्त केला.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link