Next
हिमायतनगरमध्ये ‘भारत नेट’ प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला प्रारंभ
नागेश शिंदे
Wednesday, June 19, 2019 | 05:54 PM
15 0 0
Share this article:


हिमायतनगर : केंद्र सरकारच्या भारत नेट या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याला हिमायतनगर तालुक्यातून सुरुवात झाली असून, १७ जून २०१९ रोजी तहसीलदार एस. बी. जाधव यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन तहसील कार्यालय येथे करण्यात आले.

भारत नेट प्रकल्प महाराष्ट्र राज्य माहिती व तंत्रज्ञान महामंडळ मुंबई यांच्यामार्फत राबविण्यात येत असून, या प्रकल्पाद्वारे नांदेड जिल्ह्यातील ११ तहसील कार्यालयांमध्ये व त्या अंतर्गत येणार्‍या ९६४ ग्रामपंचायतींना ऑप्टिकल फायबर नेटवर्क ब्रॉडबँडने जोडले जाणार आहे. ग्रामस्तरावरील नागरिकांना डिजिटल सेवा देऊन त्यांना जगाशी जोडण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने हा उपक्रम सुरू केला आहे. हिमायतनगर तालुक्यातील ५२ ग्रामपंचायती या प्रकल्पाअंतर्गत जोडण्यात येणार आहेत. 

या प्रकल्पात राहील भोकर ६७, बिलोली ७३, देगलूर ९६, हदगाव १२५, माहूर ६२, हिमायतनगर ५२, लोहा ११८, मुदखेड ५१, मुखेड १२७, उमरी ५८, किनवट १३४ अशा एकूण ११ तालुक्यांत तीन हजार ८०७ किलोमीटरची केबल टाकून ९६४ ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरने जोडण्यात येणार आहेत. हे काम नांदेड जिल्ह्यात पूर्ण करण्यासाठी शासनाने स्टरलाइट या कंपनीची निवड केली आहे.


हिमायतनगर येथे झालेल्या या कार्यक्रमासाठी हिमायतनगर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. मांजरमकर, नायब तहसीलदार तामस्कर, श्री. सय्यद, गायकवाड, डावरे, नीरज धामणगाव, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक ज्ञानेश्वर रांजणे, सय्यद वाजिद, विकास, बोल्बम राय, राम डांगे, विठ्ठल लढे, शिवसाई अनंतवार, कमलेश बालपांडे, साईप्रसाद गुडेवार, प्रकाश कुमार, मुजाहिद खान, आपले सरकार सेवा केंद्राचे तालुका व्यवस्थापक नितीन मेहत्रे, स्टरलाइट कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक हर्षा मनाम आदी मान्यवर, तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक नीरज धामणगाव यांनी केले. अव्वल कारकून (हिमायतनगर) श्री. पाळेकर यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search