Next
पीएफएलची मध्यम उत्पन्न अधिवासी प्रकल्पांमध्ये गुंतवणूक
प्रेस रिलीज
Tuesday, February 20 | 11:21 AM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘पिरामल एंटरप्राइजेस लिमिटेड’ची उपकंपनी असलेल्या ‘पिरामल फायनान्स लिमिटेड’तर्फे (पीएफएल) भारतातील प्रमुख शहरांमध्ये परवडणाऱ्या आणि मध्यम उत्पन्नातील अधिवासी प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी खास टीम तयार करण्यात आलेली आहे. पीएफएलला प्रमुख शहरांमध्ये सक्रिय विचाराअंतर्गत व्यवहारांसह तीन हजार कोटी रुपयांची प्राथमिक स्तरावर मान्यता मिळालेली आहे.

पूर्णपणे भांडवली भरातून सहभागी होण्याच्या अनोख्या क्षमतेसह, पीएफएल ट्रेडमार्क भागीदारीचा दृष्टीकोन पाळेल. परवडणाऱ्या घरांच्या गुंतवणुकीसाठीचा हा दृष्टीकोन आहे. ज्यांना जमीन खरेदी करायची आहे, किंवा विकसित करायची आहे आणि प्राथमिक स्तरावरच भांडवली विकास व्हावा असे ज्यांना वाटते आहे; अशा सर्वोत्तम विकासकांसाठी, अस्सल आणि प्राधान्य असलेले इक्विटी भांडवल पुरवण्यासाठी पीएफएल सक्षम आहे. याशिवाय पीएफएल सक्रियपणे जमिनीच्या संपादनाची संधी स्वबळावर घेईल आणि संलग्नित विकासासाठी विकासकांना आमंत्रित करेल. 

याचवेळी प्रोप्रायटरी घाऊक कर्जाचे बुक पीएफएलद्वारे, प्रकल्पाच्या बांधकामासाठीच्या वित्तीय मदतीला सक्षमपणे मंजूरी दिली जाईल. यामुळे विकासकांना कुठल्याही प्रकारे वित्तीय क्लोजर प्राप्त करणे शक्य होते. सादरीकरणासह आरईआरए (RERA), हा एक चांगला फायदा आहे. यामुळे विकासकांना वित्तीय मदतीची काळजी न करता, पूर्णपणे प्रकल्पावर लक्ष केंद्रीत करता येते. 

याशिवाय, पीएफएलच्या विक्री आणि संशोधन प्रक्रिया ‘ब्रिकेक्स’द्वारे विकासकांना मल्टी-चॅनेल वितरकांचा लाभ घेता येईल; शिवाय मार्केटिंगची धोरणे बनवण्यासाठी ब्रोकर नेटवर्कचा फायदा होईल, याबरोबरच भागीदारांमुळे प्राथमिक विक्री करता येईल.

प्रकल्पातील नेहमीच्या लोकांना या प्रकारातून, वेतनधारी व्यावसायिक आणि स्वयंरोजगार असलेल्या व्यक्ती अशा दोहोंसाठी सेवा देता येईल. पारंपरिक गृहकर्जे देणाऱ्यांना वेतनधारी वर्गावर लक्ष केंद्रीत करता येईल. पिरामल हाउसिंग फायनान्सतर्फे प्रत्येक घर खरेदी करणाऱ्या व्यक्तींना (वेतनधारी आणि स्वयंरोजगार असलेल्या दोन्ही) निधी उपलब्ध करून देऊन ही त्रुटी दूर करता येईल. यासाठी टेलरमेड उत्पादनांच्या श्रेणीद्वारे परवडणाऱ्या घर प्रकारात लक्ष दिले जाईल. 

खुश्रु जिजिनापिरामल फायनान्स लिमिटेड आणि पिरामल हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक खुश्रु जिजिना म्हणाले, ‘बाजारपेठेतील अनेकांनी परवडणाऱ्या आणि मध्यम-उत्पन्नाच्या घरांसाठी इक्विटी किंवा डेब्ट भांडवल पुरवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. आम्ही विस्तारीत परिपूर्ण अशी उपाययोजना देऊ शकतो, असा आम्हाला विश्वास वाटतो. प्राथमिक स्तरावरील इक्विटी, तसेच बांधकामाशी जोडलेल्या डेब्ट अशा दोन्हींद्वारे विकासकांना प्रकल्पासाठी डे झिरोवर वित्तीय क्लोजर मिळवण्यासाठी आम्ही मदत करतो.

तसेच, ब्रिकेक्सद्वारे विक्रीला चालना देणे आणि सानुकूल गृह कर्जाच्या उत्पादनांद्वारे विक्री करणे; विशेषतः वेतनधारी तसेच स्वयंरोजगार असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी अनोखा स्पर्धात्मक फायदा दिला जात आहे. आमच्याकडे आता सर्वात चांगली अनुभवी टीम आहे, जिने खास करून या प्रकारावरच लक्ष केंद्रित केले आहे आणि सन २०२०पर्यंत दोन अब्ज यूएस डॉलर्स, इतके हे प्रमाण वाढवण्याचा त्यांचा हेतू आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link