Next
‘शाओमी’तर्फे भारतात ‘वाय टू’, ‘एमआययूआय १०’ सादर
प्रेस रिलीज
Tuesday, June 12, 2018 | 12:23 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : ‘शाओमी’ या भारताच्या पहिल्या क्रमांकाच्या स्मार्टफोन ब्रॅंडने भारतात वाय सिरीजमधील नवीन ‘रेडमी वाय टू’ स्मार्टफोन सादर केला. हा स्मार्टफोन तरुणांचा विचार करून तयार करण्यात आला आहे, जो अपवादात्मक सेल्फी अनुभव देतो; तसेच ब्रॅंडने आपल्या ऑपरेटिंग सॉफ्टवेअरमधील नवीन ‘एमआययूआय १०’ देखील सादर केला. हा स्मार्टफोन अधिक व्यापक फुल स्क्रिन डिस्प्लेचा अनुभव देतो.

सेल्फीजसाठी सर्वोत्तम रेडमी फोन अशी ओळख असलेल्या ‘रेडमी वाय टू’मध्ये एआय-समर्थित १६ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. या कॅमेर्‍यामध्ये पिक्सलला एकत्र करणारे तंत्र आणि शाओमीचे एआय ब्युटीफाय वैशिष्ट्ये आहेत. नऊ हजार रुपये इतकी सुरुवातीची किंमत असलेला ‘रेडमी वाय टू’ बारा मेगापिक्सल व पाच मेगापिक्सल एआय ड्युअल कॅमेरासह देखील येतो. या स्मार्टफोनमध्ये ५.९९ इंची १८:९ फुल स्क्रिन डिस्प्ले आणि क्वॉलकॉमच् स्नॅपड्रॅगनत्र ६२५ तंत्रज्ञान आहे.

शाओमीचे अध्यक्ष आणि शाओमी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनू जैन म्हणाले, ‘मला वाटते ‘शाओमी’ने केलेल्या विकासामागील प्रमुख कारण म्हणजे ग्राहकांवर लक्ष केंद्रित करत नाविन्यपूर्ण उत्पादने निर्माण करण्यावर असलेला आमचा विश्‍वास. गेल्या वर्षात आम्हाला तरुणांशी संबंधित डिवाइसची गरज समजली. हे तरुण स्वतःचे स्थान निर्माण करणार्‍या डिवाइसचा शोध घेत होते. ‘रेडमी वाय वन’ने बाजारपेठेमधील ही पोकळी दूर केली. सहा महिन्यांच्या अल्पकालावधीतच ‘रेडमी वाय वन’ देशातील सर्वाधिक विक्री झालेला सेल्फी फोन बनला. रेडमी वाय सिरीजच्या वापरकर्त्यांमधील ५७ टक्के ग्राहक २४ वर्षे वयोगटाखालील होते, असे निदर्शनास आले. ‘शाओमी’च्या कोणत्याही डिवाइससाठी हे प्रमाण सर्वाधिक होते. यामधून आमच्या वाय सिरीजचे भव्य यश दिसून आले आहे.’

‘एमआययूआय १०’ भारतातील मोठा ग्राहकवर्ग लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहे. पेटीएम क्यूआर कोड स्कॅनर आणि इन-बिल्ट ब्राउजरमधील लोकल सर्व्हिस पेज अशी दुहेरी भूमिका बजावणारे कॅमेरा अ‍ॅप, पीडब्ल्यूएचे (प्रोग्रेसिव्ह वेब अ‍ॅप्स) फुल सपोर्ट, एमआय म्युझिक व एमआय व्हिडिओच्या कंटेंट संपन्न लायब्ररीज अशी वैशिष्ट्ये असलेला हा स्मार्टफोन उत्तम, मनोरंजनपूर्ण व एर्गोनॉमिक अनुभव देतो. ‘एमआययूआय १०’ सर्व व्यावसायिक मॅसेजेस्मध्ये क्विक मेनूची भर करतो. ज्यामुळे युजर्सना एकाच टॅपमध्ये अधिक सेवा मिळू शकतात. ‘एमआययूआय १०’ ची विक्री जूनच्या मध्यापासून सुरू होईल आणि स्टेबल व्हर्जन्स सप्टेंबरपासून सुरू होतील.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search