Next
हॅप्पी लोन्सतर्फे एमएसएमई क्षेत्राला कर्जवाटप
प्रेस रिलीज
Monday, February 26 | 03:03 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘अर्थइम्पॅक्ट फिनसर्व्ह’ या प्रगतीशील कर्जदात्यांच्या ‘हॅप्पी लोन्स’ या विशेषतः दुर्लक्षित व अर्हताविहीन अशा सूक्ष्म आणि लघुउद्योगांना कर्ज पुरवणाऱ्या योजनेने पहिले वर्ष पूर्ण केले आहे. इतक्या अल्पावधीतच ‘हॅप्पी लोन्स’ ही योजना सुमारे आठ हजार लघुकर्जे वितरित करण्यात यशस्वी झाली आहे आणि हा वेग ‘वित्त आणि तंत्रज्ञान’ या क्षेत्रात सर्वात जास्त आहे. याबरोबरच कंपनीने आपला सूक्ष्मकर्जे देण्याचा व्यवसाय काटेकोरपणे २६ राज्यांमध्ये पोचवला आहे. यामुळे देशातल्या अनेक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांना कर्ज मिळवणे सोपे बनले आहे. वितरित कर्जदारांपैकी ५५ टक्के कर्जदारांना दुसऱ्यांदा या कर्जांचा फायदा घेता आला आहे, यातच या मोहिमेचे यश सामावले आहे.

आधुनिक तंत्र आणि सर्वेक्षणाद्वारे गोळा केलेली माहिती यांच्या आधारे ही कर्जे कमीत कमी दोन हजार ते जास्तीत जास्त एक लाख रुपये आणि सरासरी तीस हजार रुपये अशा स्तरांवर वितरित केली जातात. हॅप्पी लोन्स आपल्या सर्व प्रतिनिधींशी सतत संपर्कात राहून, विनाविलंब ही कर्जे वितरीत होतील याची खातरजमा करतात.

मनिष खेराहॅप्पी लोन्सचे संस्थापक मनीष खेरा म्हणाले, ‘कर्जवितरणात कुठलेही डावे-उजवे होऊ नये ही मध्यवर्ती कल्पना घेऊन, आम्ही संस्थेची स्थापना केली आहे आणि सूक्ष्म आणि लघुउद्योगांना भांडवल पुरवून आम्ही भारताच्या विकासाला हातभार लावत आहोत, याचा आम्हाला आनंद आहे. आधुनिकीकरणापासून वंचित राहिलेल्या ग्राहकांपर्यंत पोचण्यासाठी जनसामान्यांशी संपर्क ठेवण्याच्या आमच्या कार्यपद्धतीमुळे ग्राहकांना मदतीचा हात पुढे करणाऱ्या या योजनेला यश लाभत आहे. आमची सोपी आणि लवचिक कर्जे सूक्ष्म आणि लघुउद्योजकांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यास मदत करतील.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link