Next
‘शेतकऱ्यांनी नैसर्गिक खतांचा वापर करावा’
डॉ. अरुण दीक्षित यांचा सल्ला
प्रेस रिलीज
Tuesday, September 04 | 01:07 PM
15 0 0
Share this story


पुणे : ‘नैसर्गिक खते शेतीसाठी अधिक उपयुक्त असतात. त्यातून उत्तम दर्जाचे उत्पन्न निघू शकते. शिवाय, विषमुक्त शेती करणे शक्य आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी रसायनाचा अधिक वापर करण्यापेक्षा उपलब्ध नैसर्गिक आणि पोषक खतांचा वापर करावा. यासाठी अझोलासारख्या पाणवनस्पतीचे संवर्धन करून आपण कसा वापर करू शकतो यावर काम सुरु आहे’, असे पाबळ येथील विज्ञान आश्रमातील संशोधक डॉ. अरुण दीक्षित सांगितले.

डॉ. अरुण दीक्षित
मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग, मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्र व महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (एमकेसीएल) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वैज्ञानिक कट्ट्यावर डॉ. दीक्षित बोलत होते. नत्रचक्र कसे व कोण चालवते? हा गप्पांचा विषय होता. या वेळी मराठी विज्ञान परिषदेच्या पुणे विभागाचे अध्यक्ष विनय र. र., डॉ. विद्याधर बोरकर यांच्यासह विज्ञानप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

डॉ. दीक्षित म्हणाले, ‘कर्ब, प्राणवायू, हायड्रोजन, नत्रवायू, स्फुरद व पालाश यांची प्रामुख्याने वनस्पतीना आवश्यकता असते. शेतकऱ्यांनी एकच पीक घेण्यापेक्षा आलटून-पालटून पिके घ्यावीत. कडधान्य, ताग अशी पिके घेतल्यास जमीन पोषक बनते व जमिनीमध्ये नत्राचे स्थिरीकरण होते. यातून शेतकऱ्याला चांगले उत्पन्न मिळण्यास मदत होईल;तसेच अझोलासारखी पाणवनस्पती नत्राचे उत्तमरीत्या स्थिरीकरण करते. ज्या वनस्पतींना जास्त प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. त्याठिकाणी अझोला लावल्यास त्या पिकाला उत्तम खत मिळू शकते. या पाणवनस्पतीपासून जैव खत करणे सोपे, स्वस्त आणि पिकांच्या दृष्टीने उपयोगी असल्याचे सिद्ध झाले आहे. व्यापारी तत्वावर ते पिकांसाठी कसे उपलब्ध होईल याचे संशोधन पाबळ येथे सुरू आहे. अडसळी, कडधान्यांची लागवड केल्यास त्यांच्या मुळाशी असणारे सूक्ष्मजीव जमिनीतल नत्राचे प्रमाण वाढवतात, परंतु या पद्धतीला शेतकऱ्याकडून जास्त पसंती मिळत नाही.’   

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विज्ञान परिषदेचे कार्याध्यक्ष विनय र. र. यांनी केले. आभार डॉ. विद्याधर बोरकर यांनी मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link