Next
रोटरी क्लबतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन
BOI
Wednesday, July 03, 2019 | 04:05 PM
15 0 0
Share this article:


रत्नागिरी : जिल्हा शासकीय रुग्णालयात रक्ताची भासणारी निकड लक्षात घेऊन रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ३५ जणांनी रक्तदान केले.
 
शिबिराचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोलडे यांनी केले. या वेळी रोटरी क्लबच्या अध्यक्ष वेदा मुकादम, डिस्ट्रिक्ट असिस्टंट गव्हर्नर देवदत्त मुकादम, धरमसी चौहान, बँक ऑफ इंडियाचे निवृत्त व्यवस्थापक विजय पवार, नीलेश मुळे आदी रोटेरियन उपस्थित होते. या शिबिरात ३५ जणांनी रक्तदान करून रक्तपेढीची गरज तात्पुरती भागवली. 

‘रक्तदान ही आजच्या काळातील महत्त्वाची गरज आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयाला कायम असणारी रक्ताची गरज भागविण्यासाठी रोटरी क्लब आशा स्वरूपाची शिबिरे आयोजित करेल,’ असे आश्वासन वेदा मुकादम यांनी या वेळी दिले.
 
शिबिराच्या यशस्वीतेसाठी रक्तपेढीचे रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. अर्जुन सुतार, अधिपरिचरिका श्रुती जाधव, जनसंपर्क अधिकारी योगिता सावंत, रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी विक्रम चव्हाण, गौरी सावंत, संगीता धोपटे, विनोद पावरा, मयुरी वारंग, जाणीव फाउंडेशन, मुकेश गुप्ता, कृष्णा मकवाना, संदीप पवार, वैशाली बेटकर यांनी विशेष सहकार्य केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search