Next
नरेंद्र गोईदानी यांचे व्याख्यान
प्रेस रिलीज
Saturday, March 17, 2018 | 03:06 PM
15 0 0
Share this story

नरेंद्र गोईदानीपुणे : ‘बी. जे. शासकिय वैद्यकीय महाविद्यालय’ व ससून सर्वोपचार, पुणे येथे १५ मार्च रोजी महात्मा गांधी सभागृहात मोटिवेशनल स्पीकर नरेंद्र गोईदानी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या वेळी ते म्हणाले, ‘वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टर्स व परिचारिकांना मोठ्या प्रमाणात ताणतणावाला सामोरे जावे लागते, कुटुंबाला वेळ देता येत नाही. तरीही सतत रुग्णसेवेत असताना आनंदी रहायला शिकले पाहिजे. कोणत्याही दुर्घटनेचा बाऊ न करता उपाय केले पाहिजेत.’ यासाठी त्यांनी अरुणिमा सिन्हा यांचे प्रेरणादायी उदाहरण दिले. ‘आनंद यशाकडे घेऊन जातो, तर दुःख अपयशाकडे नेते,’ असे त्यांनी स्पष्ट केले.
 
या वेळी बोलताना अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले म्हणाले, ‘डॉक्टर्स व परिचारिकांच्या टीमला मोटिवेट करण्यासाठी, अशा उपक्रमांचे आयोजन ससूनमध्ये नियमितपणे केले जाते. यातून टीम स्पिरिट व सकारात्मकता वाढीस लागते.’  
   
याच कार्यक्रमात ‘माय बीजेजीएमसी’ या अॅपचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थी प्रतिनिधी पराग पाटील याने, महाराष्ट्रतील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये बी. जे.ने प्रथमच असे अॅप डेव्हलप केल्याचे सांगितले.
   
‘तंत्रज्ञानाचा उपयोग शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी होईल,’ असे प्रतिपादन डॉ. मुरलीधर तांबे यांनी केले. 

कार्यक्रमाला डॉ. अरुण कोवाळे  डॉ. समीर जोशी, डॉ. सोमनाथ सलगर, डॉ. हरीश टाटीया, सर्व अध्यापक, सर्व परिचारिका, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link