Next
दीपिका रेड्डी यांच्या कुचीपुडी नृत्याची पर्वणी
BOI
Monday, April 15, 2019 | 06:00 PM
15 0 0
Share this article:

पुणे : ‘नृत्ययात्री’ संस्थेच्या संस्थापिका मेघना साबडे आणि पौर्णिमा व दिनेश रास्ते यांच्यातर्फे शनिवारी, २० एप्रिल २०१९ रोजी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मराठ्यांच्या इतिहासात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या रास्ते कुटुंबाविषयीच्या ‘क्रॉनिकल्स ऑफ रास्ते फॅमिली ऑफ मेहूणपुरा’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार असून, त्याबरोबरच प्रसिद्ध नृत्यांगना दीपिका रेड्डी यांच्या कुचीपुडी नृत्याची पर्वणी रसिकांना अनुभवता येणार आहे. 

हा कार्यक्रम शनिवारी, २० एप्रिल २०१९ रोजी भोसलेनगर, रेंजहिल्स जवळील सिम्बायोसिस सभागृहात सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे. कार्यक्रम विनामूल्य व सर्वांसाठी खुला आहे.

याबाबत अधिक माहिती देताना मेघना साबडे म्हणाल्या, ‘नर्तक व नृत्यांगनांचा विकास व नृत्याच्या प्रचार-प्रसारासाठी नृत्ययात्री कायमच प्रयत्नशील असून, त्याचाच एक भाग म्हणून आतापर्यंत आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यशाळा व कार्यक्रमांमधून अनेक जागतिक स्तरावरील कलाकारांच्या कलेचा आस्वाद पुणेकरांना घेता आला आहे. याही वेळी निमंत्रित करण्यात आलेल्या नृत्यांगना दीपिका रेड्डी या प्रसिद्ध कुचीपुडी नृत्यांगना आहेत. पुणेकरांना हा नृत्यप्रकार क्वचितच बघायला मिळत असल्याने ही खास पर्वणीच असणार आहे. रेड्डी या पुण्यात पहिल्यांदाच सदरीकरण करणार आहेत. त्यांनी हा नृत्यप्रवास ४७ वर्षांपूर्वी सुरू केला. पद्म भूषण गुरु डॉ. वेंपत्ती चिन्ना सत्यम यांच्या त्या शिष्या आहेत. रेड्डी यांनी देशात-विदेशात अनेक नामवंत नृत्य महोत्सवात आपली कला सादर केली आहे. त्या सादरकर्त्या, नृत्यांगना आणि गुरु अशा तीनही भूमिका यशस्वीरीत्या बजावतात. त्यांना संगीत नाटक अकादमीचा (२०१७) पुरस्कार, तेलंगणा सरकारचा राज्य पुरस्कार (२०१६), अशा अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.’

‘या कार्यक्रमात अमेय फडणीस यांनी रास्ते कुटुंबीयांच्या इतिहासाबद्दल लिहिलेल्या ‘क्रॉनिकल्स ऑफ रास्ते फॅमिली ऑफ मेहूणपुरा’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. रास्ते कुटुंबाचे मराठ्यांच्या इतिहासात मोलाचे योगदान आहे. कोकणामधील एक सामान्य शेतकरी कुटुंब असलेले रास्ते कुटुंब मराठा व ब्रिटिशकालीन कालखंडात एक महत्त्वाचे सामंती कुटुंब म्हणून नावारुपास आले, त्याचा प्रवास या पुस्तकात शब्दबद्ध केला आहे,’ असेही साबडे यांनी सांगितले.

कार्यक्रमाविषयी 
कुचीपुडी नृत्य सादरीकरण व पुस्तक प्रकाशन 
स्थळ : सिम्बायोसिस सभागृह, भोसलेनगर.
दिवस व वेळ : शनिवार, २० एप्रिल, सायंकाळी साडेपाच वाजता.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search