Next
दुष्काळग्रस्तांना तातडीने मदत मिळणार
आकस्मिकता निधीत दोन हजार कोटींची वाढ
प्रेस रिलीज
Wednesday, February 13, 2019 | 04:19 PM
15 0 0
Share this story

मुंबई : राज्यात २०१८च्या खरीप हंगामातील नैसर्गिक परिस्थितीमुळे १५१ तालुक्यांत दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. या तालुक्यांतील बाधित शेतकऱ्यांना शेतीपिकाच्या नुकसानीपोटी तातडीने मदत वाटप करण्यासाठी दोन हजार कोटींचा आकस्मिकता निधी अग्रिमाद्वारे उपलब्ध करून देण्यास मंत्रिमंडळाकडून मान्यता देण्यात आली. यासाठी राज्याच्या आकस्मिक निधीच्या १५० कोटी इतक्या कायमच्या मर्यादेत दोन हजार कोटींनी तात्पुरती वाढ करून ती दोन हजार १५० कोटी इतकी करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

राज्यातील १५१ तालुक्यांमध्ये गंभीर आणि मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. दुष्काळग्रस्त तालुक्यातील शेतकऱ्यांना शेती पिकाच्या नुकसानीबद्दल तातडीने मदत वाटप करण्यासाठी दोन हजार कोटी इतका अतिरिक्त निधी आकस्मिक निधी अग्रिमाद्वारे उपलब्ध करून देणे आवश्यक होते. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link