Next
‘सूर्यदत्ता’च्या बीएस्सी अ‍ॅनिमेशनच्या विद्यार्थ्यांचे यश
BOI
Wednesday, June 19, 2019 | 11:28 AM
15 0 0
Share this article:

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या वार्षिक परीक्षेत सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली. सूर्यदत्ता कॉलेज ऑफ मॅनेजमेंट इन्फर्मेशन रिसर्च अ‍ॅंड टेक्नॉलॉजीच्या (एससीएमआयआरटी) तिसर्‍या वर्षात ऋषिकेश सुराडकर ७७.८३ टक्के गुण मिळवत विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत सहावा आला आहे. अ‍ॅन्ड्रयू केदारी याने ७५.४४ टक्के, वैभव फाळके याने ७०.५० टक्के, तर निरज माखरे याने ७०.०६ टक्के गुण मिळवले. वैभव फाळकेची अ‍ॅफिनिटी कंपनीमध्ये निवड झाली असून, अवघ्या सहा महिन्यांत टीम लीडर म्हणून त्याला बढती मिळाली आहे. 

द्वितीय वर्षात साक्षी येवले (८३.२२ टक्के) विद्यापीठात तिसरी, तर मनोहर ठाकोरे (८१.६७) विद्यापीठात सहावा आला आहे. नेहा कांबळे (८०.५६), अजिंक्य हेंद्रे (७२.७८), संकेत थिगळे (७१.३३) यांनी प्रथम श्रेणी प्राप्त केली आहे. सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी उल्लेखनीय यश मिळवल्याबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले; तसेच विद्यार्थ्यांची कामगिरी उंचावण्यासाठी प्रामाणिक मेहनत घेणार्‍या प्राध्यापकांचे, पालकांचे आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search