Next
‘स्पर्धात्मक युगात ‘अपडेट’ राहायला हवे’
प्रेस रिलीज
Monday, March 19, 2018 | 04:02 PM
15 0 0
Share this storyपुणे : ‘सध्याचे युग स्पर्धेचे आहे. त्यामुळे महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर आपल्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. बाहेरच्या या स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी आपल्याला नवे बदल आत्मसात करून स्वतःला ‘अपडेट’ ठेवायला हवे,’ असा कानमंत्र पुनय्याचे पोलीस सहआयुक्त रवींद्र कदम यांनी विद्यार्थ्यांना दिला.
 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या एमआयटी मिटसॉम महाविद्यालयाच्या पदवी प्रदान सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माईर्स एमआयटीचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड, एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंटचे अधिष्ठाता डॉ. आर. एम. चिटणीस, जेट एअरवेजचे उपाध्यक्ष गिलबर्ट जॉर्ज, ‘आयआयएम’ इंदौरच्या डॉ. मधुश्री श्रीवास्तव, नॅशनल डिफेन्स अॅकॅडमीचे बटालिअन कमांडर कॅप्टन देवांशु रस्तोगी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. या समारंभात बीबीए, बीबीए-सीए व बीबीए-आयबीच्या एकूण २५०पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मिटसॉम कॉलेजच्या पदवीप्रदान समारंभ प्रसंगी डावीकडून डॉ. एम. मुरुगानंद, कॅप्टन देवांशू रस्तोगी, प्रा. डॉ. अंजली साने, प्रा. डॉ. विश्‍वनाथ कराड, स्नातक, रवींद्र कदम, गिल्बर्ट जॉर्ज व डॉ. आर. एम. चिटणीस.पोलीस सहआयुक्त कदम म्हणाले, ‘विद्यार्थ्यांच्या जीवनाला आधार देऊन त्यांना उभे करण्याचे कार्य शिक्षक व विद्यापीठामार्फत होत असते. अशा वेळी स्पर्धात्मक युगात प्रवेश करताना प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःला सक्षम करणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांना हताश होण्याची परिस्थिती येणार नाही. स्टीव जॉब्ज यांच्या वक्तव्यानुसार उपलब्ध वेळ मर्यादित आहे. त्यामुळे प्रत्येक क्षणा-क्षणाचा उपयोग चांगल्या कार्यासाठी करा. या मर्यादित वेळेतच शिक्षणाचा योग्य वापर करून स्वतःच्या प्रगतीबरोबरच लोकांना रोजगार देण्याचे कार्य करावे.’

प्रा. डॉ. कराड म्हणाले, ‘१८९७ मध्ये भारताचे थोर सुपुत्र स्वामी विवेकानंद यांनी भाकित केल्याप्रमाणे २१वे शतक हे भारताचे शतक असेल. २१व्या शतकात भारत हा जगात ज्ञानाचे दालन म्हणून उदयास येईल. त्यासाठी प्रयत्न करण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. खरे म्हणजे देवळात बसून गीता वाचण्यापेक्षा फुटबॉलच्या मैदानावर जाऊन खेळणे चांगले आहे.’

कॅप्टन रस्तोगी म्हणाले, ‘विद्यार्थांनी एक उत्तम लीडर व्हायला हवे. नेतृत्वगुणांचा विकास करून समाजापुढे आदर्श ठेवायला हवा. लीडरशिप करण्यासाठी कॅरॅक्टर, कम्पॅशन, कमिटमेंट आणि करेज ऑफ कन्व्हीक्शन असे चार सी महत्त्वपूर्ण आहेत. विद्यार्थ्यांनी नेहमी उत्साही, तत्पर असायला हवे. जीवनात समतोल ठेवायला हवा.’

‘नवीन तंत्रज्ञान आणि गॅजेट्स यात तरुणाई जास्त गुंतलेली दिसत आहे. याऐवजी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या बौद्धिक क्षमतेचा जास्तीत जास्त उपयोग करायला हवा. प्रश्न आणि आव्हानांना सामोरे जा. प्रश्न न विचारून स्वतःच्या संधी कमी करू नका. पदवी ग्रहण केल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करते,’ असे मत डॉ. श्रीवास्तव यांनी व्यक्त केले.

डॉ. आर. एम. चिटणीस यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा. गौतम बापट यांनी केले. आभार डॉ. अंजली साने यांनी मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link