Next
डॉ. स्नेहल तावरे संपादित पुस्तकाचे प्रकाशन
जपानमध्ये १८ व्या आंतरराष्ट्रीय आंतरविद्याशाखीय परिषदेचे आयोजन
BOI
Tuesday, June 11, 2019 | 01:45 PM
15 0 0
Share this article:

पुस्तकाचे  प्रकाशन करताना डॉ.  इचोरो न्युमाटा,  डॉ. शिनोबी यामागुची, डॉ. शोगो वाटानाबे, डॉ. एल. व्ही. तावरे, डॉ. टायगेन हाशिमोटो, डॉ. शोगो  इवाई व डॉ. स्नेहल तावरे

टोकियो : जपानमधील टोयो युनिव्हर्सिटी आणि स्नेहवर्धन रिसर्च इन्स्टिट्युटच्या वतीने ‘देश आणि विदेशातील बौद्ध दर्शन आणि बौद्ध संस्कृती यांचे विविधांगी स्वरूप’ या विषयावर १८ व्या आंतरराष्ट्रीय आंतरविद्याशाखीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. टोयो युनिव्हर्सिटीत सहा जून २०१९ रोजी ही परिषद झाली. या परिषदेला भारत, मॉरिशस, अमेरिका येथील प्राध्यापक उपस्थित होते. त्यांनी लिहिलेल्या एकूण २५ लेखांचे एक पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. 

त्याचे संपादन पुण्याच्या डॉ. स्नेहल तावरे यांनी केले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. शिनोबी यामागुची, डॉ. शोगो वाटानाबे, डॉ. एल. व्ही. तावरे, डॉ. टायगेन हाशिमोटो, डॉ. शोगो  इवाई आणि डॉ. स्नेहल तावरे यांच्या हस्ते झाले. या वेळी उपस्थित वक्त्यांनी आपले विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन मॉरिशसच्या डॉ. लक्ष्मी झमन यांनी केले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 66 Days ago
This book would be indispensable for libraries . Libraries are meant for such books . After. All , how many individuals would be interested In such subjects?
0
0

Select Language
Share Link
 
Search