Next
‘एमसीई’तर्फे शिवजयंतीनिमित्त मिरवणूक
प्रेस रिलीज
Monday, February 19 | 06:33 PM
15 0 0
Share this story

पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन (एमसीई) सोसायटीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पुण्यातील अल्पसंख्य, बहुजन समाजातील विद्यार्थ्याच्या भव्य अभिवादन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.

सोमवारी (१९ फेब्रुवारी) सकाळी साडेआठ वाजता संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांच्या हस्ते मिरवणुकीस प्रारंभ झाला. एकूण दहा हजार विद्यार्थी या मिरवणुकीत सहभागी झाले होते. मिरवणुकीचे हे १७वे वर्ष होते. या मिरवणुकीचे नेतृत्व संस्थेचे सचिव लतिफ मगदूम यांनी केले.

आझम कँपस ते लाल महाल असा या मिरवणुकीचा मार्ग होता. संस्थेच्या कला महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी तयार केलेला ‘समतावादी छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावर आधारित ‘बारा बलुतेदार’ हा देखावा मिरवणुकीचे आकर्षण ठरला.

मिरवणुकीत दरबार ब्रास बँडची दोन पथके, ढोल-ताशांचे पथक, तुतारी, नगारे, छत्रपती शिवाजी महाराजांची तैलचित्रे असलेली गाडी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांच्या हातात ‘जाणता राजा’, ‘समतेचा पुरस्कार्थी राजा’, ‘स्त्रियांचा आदर करणारे राजे’, ‘रयतेचे स्वराज्य निर्माण करणारे राजे’ ‘शेतकर्‍यांचा कैवारी’ आदी घोषवाक्यांचे फलक होते.

मिरवणुकीत शाहीद इनामदार, वाहिद बियाबानी, सिकंदर पटेल, शाहीद मुनीर शेख, डॉ. शैला बूटवाला, डॉ. व्ही. एन. जगताप, डॉ. किरण भिसे, प्रा. रबाब खान, प्रा. आयेशा शेख, प्रा. परवीन शेख, प्रा. गफार सय्यद, प्रा. गुलजार शेख, प्रा. मजिद सय्यद, प्रा. हेमा जैन, प्रा. इरफान शेख, पदाधिकारी, शिक्षक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link