Next
‘पेटीएम’चे सोप्या फीचर्ससह अद्ययावत अॅप
प्रेस रिलीज
Tuesday, April 03, 2018 | 12:48 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : ग्राहक आणि व्यापाऱ्यांना व्यापक स्वरूपात देयक सुविधा प्रदान करणारे भारतातील अग्रणी पेमेंट गेटवे पेटीएमने अधिक सोयीस्कर आणि युजर फ्रेंडली बनविण्यासाठी अॅपचे पुनर्निर्माण केले आहे. अॅपच्या अद्यतनाद्वारे पैसे हस्तांतरणाची प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद झाली आहे.

शून्य टक्के शुल्क आकारणीसह वापरकर्त्यांच्या पेटीएम पेमेंट बँक खात्यातून, पेटीएम वॉलेट किंवा कोणत्याही बँक खात्यातून इतर कोणत्याही बँक खात्यात त्वरित हस्तांतरणाची सुविधा देते. खात्याची माहिती आणि शिल्लक एकाच स्नॅपशॉटमध्ये उपलब्ध झाल्यामुळे पासबुक संदर्भातील सर्व माहिती त्वरित उपलब्ध होते. नवीन सुविधांद्वारे पेटीएमचे उद्दिष्ट या वर्षात पैसे हस्तांतरणात वृद्धी मिळविण्याचे आहे.

एका वॉलेट कंपनीपासून सुरुवात करून पेटीएमने मल्टि-सोर्स आणि मल्टि डेस्टिनीटेशन समाधानांद्वारे संपूर्ण देयक प्रदात्याच्या स्वरूपात स्वतःला विकसित केले आहे. हे वापरकर्त्यांना अधिक चांगल्या प्रकारे त्यांची बँक खाती जोडण्यास आणि पेटीएम अॅप्लिकेशन्स वापरून पैसे हस्तांतरण करण्यास शिकवत आहे.

पेटीएमचे सीओओ किरण वासीरेडी म्हणाले, ‘पेटीएम अॅप्समधील नवीन पुनरारंभ इंटरफेस सादर करताना आम्ही खूप उत्सुक आहोत. आमच्या ग्राहकांना आम्ही कायम सर्वोत्तम वापरकर्ता अनुभव प्रदान करण्याच्या प्रयत्न करतो आहोत. नवीन डिझाइनने तुम्ही ताजेतवाने व्हाल आणि मनी ट्रान्सफरसह काही महत्त्वाच्या प्रवाहाची उन्नती होते आहे. मला हे सांगण्यास अतिशय आनंद होतो आहे की, डिजिटली ऑनलाइन व्यवहार करण्यासाठी आणि पेटीएम अॅप्लिकेशन्स वापरून त्यांच्या पसंतीच्या पेमेंट पद्धत वापरून आम्ही लाखो भारतीयांना पेटीएमच्या वापराला यशस्वीरित्या रुजवले आहे. आम्ही मनी ट्रान्स्फर व्यवहारातील घातांकीय वाढीचे उद्दिष्ट ठेवत आहोत, ज्यात असंघटित क्षेत्रामध्ये केलेल्या पैशाचे रूपांतर समाविष्ट आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search