Next
सातारा येथे जेरिएट्रिक शिबिराचे आयोजन
प्रेस रिलीज
Thursday, June 28, 2018 | 02:52 PM
15 0 0
Share this story

सातारा : फिनोलेक्स इंडस्ट्रीज लि. (एफआयएल) आणि त्यांचे सीएसआर भागिदार मुकुल माधव फाउंडेशन (एमएमएफ) यांच्यातर्फे जेरिएट्रिक शिबिर (ज्येष्ठ नागरिकांसाठी शिबिर) कुडाळ प्राथमिक आरोग्य केंद्रात नुकतेच आयोजित करण्यात आले. जेरिएट्रिक शिबिर आयोजित करण्यामागचा उद्देश परिसरातील ज्येष्ठांना सर्वंकष आरोग्य सुविधा तज्ज्ञ डॉक्टरांच्या हातून मिळावी हा होता.

पूर्ण दिवस चाललेल्या या शिबिरात २०० ज्येष्ठांनी आपली आरोग्य तपासणी आणि निदान पुण्यातील प्रसिद्ध रुग्णालयातून आलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमकडून करून घेतली. एच. व्ही. देसाई रुग्णालयातून नेत्ररोगतज्ज्ञ, ससून सर्वसाधारण रुग्णालयातून मानसोपचारतज्ज्ञ, भारती विद्यापीठातील फिजिशियन, स्त्रीरोगतज्ज्ञ आणि दंतरोगतज्ज्ञ, नाक-कान-घसा तज्ज्ञ आणि संचेती हॉस्पिटलमधून हाडरोगतज्ज्ञ आणि भौतिकोपचारतज्ज्ञ यांनी शिबिरात ज्येष्ठांची तपासणी केली.

‘मुकुल माधव’च्या कार्यकारी विश्वस्त रितू छाब्रिया म्हणाल्या, ‘जेरिएट्रिक शिबिराच्या माध्यमातून आपल्या समाजात सर्वाधिक दुर्लक्षित राहिलेला समूह म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना आरोग्यसेवा देण्याचा आमचा हेतू होता. ज्येष्ठांपर्यंत अनेकदा पुरेशी आरोग्यसेवा आणि लक्ष दिले जात नाही. सातारा आणि महाराष्ट्रातील अन्य भागामधील ज्येष्ठांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवणे आमचे ध्येय आहे. या शिबिरातून मिळालेल्या प्रोत्साहनामुळे प्रत्येक महिन्यात एक शिबिर साताऱ्यात आयोजित करण्याचे आम्ही ठरवले आहे. सातारा जिल्ह्यातील शासकीय यंत्रणांनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच हे शक्य झाले, आम्ही त्यांचे आभारी आहोत.’

जेरिएट्रिक शिबिराला मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॉ. कैलास शिंदे, सातारा जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांचे सहकार्य लाभले. जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना शिबिर सुरळीत व्हावे यासाठी सर्व व्यवस्था करण्याचे निर्देश दिले होते. कुडाळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राने आशा (मान्यताप्राप्त सामाजिक आरोग्य कार्यकर्ता) कर्मचारी, एएनएस (ऑक्झिलरी नर्स मिडवाइफ) आणि उपलब्ध आरोग्य अधिकार्यांच्या मदतीने तज्ज्ञ डॉक्टरांना मदत केली. सातारा जिल्हा रुग्णालयाने राष्ट्रीय आरोग्य मोहिमेअंतर्गत (एनएचएम) मोफत रक्तशर्करा चाचणी पुरविली होती.

स्थापनेपासून ‘एफआयएल’ आणि ‘एमएमएफ’ यांनी आरोग्यसेवा क्षेत्रावर आपला भर ठेवला आहे. सन २००६ पासून पुणे-रत्नागिरी पट्ट्यात २२ शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन दोन्ही संस्थांनी मिळून आतापर्यंत केले आहे. या शिबिरांच्या माध्यमातून दरवर्षी १६ हजार मुलांचे रोगनिदान होते. शिबिरांदरम्यान रोगनिदान झाल्यानंतर या मुलांच्या पालकांना डॉक्टर ज्या रुग्णालयाशी संबंधित असतील तेथे उपचारांसाठी बोलावण्यात येते जिथे त्यांची पुढील आरोग्यतपासणी आणि उपचार होतात, ज्याचा खर्च अंशतः किंवा पूर्णतः ‘एफआयएल’ किंवा ‘एमएमएफ’तर्फे करण्यात येते.

याबरोबरच २०१५पासून ‘एफआयएल’ आणि ‘एमएमएफ’ सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सेरेब्रल पाल्सीग्रस्त मुलांच्या रोगनिदान, उपचार आणि गरज असलेली साधने पुरविण्याचे कार्य करत आहे. १२ प्राथमिक आरोग्य केंद्रातील ५८२ ‘आशा’ आणि एएनएम कर्मचारी अत्यंत जोखमीच्या प्रसूती टाळण्यासाठी महिलांची तपासणी करण्यासाठी प्रशिक्षित करण्यात आल्या आहेत. पुण्यातील सिम्बायोसिस कॉलेज ऑफ नर्सिंगच्या सहकार्याने या प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात येत आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link