Next
अभ्यासपूर्ण गुंतवणूक हवी
BOI
Sunday, February 11, 2018 | 03:45 PM
15 0 0
Share this story

शेअर बाजारातील तेजी-ओहोटीचा अभ्यास करणे गुंतवणूकदारासाठी महत्त्वाचे असते. दर वर्षी काही उद्योगक्षेत्रे भरभराटीला येतात. अभ्यासपूर्वक त्यातील योग्य क्षेत्राची निवड करून चांगल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे ठरते. अशा काही शेअर्सविषयी जाणून घेऊ या आजच्या ‘समृद्धीची वाट’ या सदरात...
........
गुंतवणूक करणाऱ्याला अभ्यास व सातत्य राखायची आवश्यकता असते. कारण सर्वसाधारण निर्देशांक व निफ्टी दर वर्षी वर जात असले, तरी एखाद्या वर्षी ते कमीही होऊ शकतात. २००३ ते २०१७ या पंधरा वर्षांचे आकडे बघितले, तर हे लक्षात येईल. या कालावधीत दर वर्षी निर्देशांक झालेल्या वाढ व घटीचे आकडे खाली दिले आहेत.

या पंधरा वर्षांत निर्देशांक फक्त तीन वर्षे खाली आला होता. त्याला जागतिक घडामोडींची पार्श्वभूमी होती; पण गुंतवणूकदाराने अशा घसरणीचीही तयारी ठेवली पाहिजे. सुमारे पाच वर्षांच्या काळात चांगल्या शेअर्समधली गुंतवणूक दुप्पट होतच असते आणि दहा-पंधरा वर्षे थांबलात, तर घरावर सोन्याची नसली तरी भक्कम मंगलोरी कौले घालता येतात. दर वर्षी काही उद्योगक्षेत्रे भरभराटीला येतात. सध्या धातुक्षेत्र, रासायनिक क्षेत्र व नॉन-बँकिंग फायनान्स क्षेत्राची चलती आहे. एपी अपोलो ट्यूबज, अपोलो पाइप्स, फिलिप्स कार्बन, ग्राफाइट इंडिया, हेग, रेन इंडस्ट्रीज यांसह बजाज फायनान्स, मणप्पुरम फायनान्स व मुथुट फायनान्स या कंपन्यांचे शेअर्स गुंतवणुकीला योग्य आहेत. वर्षभरात हे शेअर्स तीस टक्के नफा मिळवून देतील. त्यापैकी मुथुट फायनान्सचा सध्या विचार करू. या कंपनीचे ३१ डिसेंबर २०१६, मार्च २०१७, जून २०१७, सप्टेंबर २०१७ व डिसेंबर २०१७चे तिमाही आकडे खाली दिले असून, ते कोटी रुपयांत आहेत.
    
 कंपनीचे भागभांडवल ३९९.९१ कोटी रुपये आहे. सध्या शेअरचा भाव ४२२ रुपये आहे. या भावाला किं/उ गुणोत्तर १४.१ पट दिसते. त्याचे गेल्या वर्षभरातील किमान व कमाल भाव ३२५ रुपये व ५२५ रुपये होते. वर्षभरात पुन्हा ५२५ रुपयांचा भाव दिसू शकेल; पण तो ५८० रुपयांपर्यंत वाढण्याचीही शक्यता आहे. कंपनीचे मार्च २०१८ व २०१९चे एकूण उत्पन्न अनुक्रमे ४२०० कोटी रुपये व ४४०० कोटी रुपये व्हावे. नक्त नफा अनुक्रमे १७५० कोटी रुपये व १८५० कोटी रुपये व्हावा. शेअरगणिक उपार्जन ४४ रुपये व ४६ रुपये व्हावे. कंपनी सोन्याच्या तारणावर कर्जे देण्याचा प्रमुख व्यवसाय करते. याचबरोबर बजाज फायनान्स, मणप्पुरम फायनान्स, उज्जीवन फायनान्स यांसारखे नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्यांचे शेअर्स वर्षभरात खूप नफा देऊन जातील.

- डॉ. वसंत पटवर्धन
(लेखक ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे माजी अध्यक्ष आहेत.)

(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल. वाचकांनी गुंतवणुकीसंदर्भातील आपल्या शंका, प्रश्न article@bytesofindia.com या ई-मेलवर पाठवावेत. निवडक प्रश्नांना या सदरातून उत्तरे दिली जातील. हे सदर दर शनिवारी आणि रविवारी प्रसिद्ध होते. त्यातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Vb1kM6 या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link