Next
‘जल क्षेत्रातदेखील कारकिर्दीच्या उत्तम संधी’
परिसंवादातील तज्ज्ञांचा सूर
BOI
Wednesday, February 27, 2019 | 05:54 PM
15 0 0
Share this story


पुणे : ‘जल क्षेत्र, जलसंधारणाकडे केवळ समाजसेवा या दृष्टीकोनातून न पाहता, त्यात तज्ज्ञता मिळवून कारकिर्दीच्या संधी शोधाव्यात, कारण या क्षेत्राला तज्ज्ञांचीच गरज आहे. त्यातून आव्हानात्मक क्षेत्रात विधायक काम आणि कारकिर्द केल्याचे समाधानही मिळेल,’ असा सूर ‘जल क्षेत्रातील कारकिर्दीच्या संधी’ या विषयावरील परिसंवादात उमटला.

रोटरी क्लब पुणे, डिस्ट्रीक्ट ३१३१ तर्फे २७ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान ‘जलोत्सव २०१९’ चे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त बुधवारी, २७ फेब्रुवारी रोजी आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयात ‘जलक्षेत्रातील कारकिर्दीच्या संधी’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादात अनेक तज्ज्ञांनी मते मांडली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माध्यम समन्वयक, पर्यावरण अभ्यासक अभिजीत घोरपडे, भूजल शास्त्रज्ञ उपेंद्र धोंडे, वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. सचिन पुणेकर यात सहभागी झाले होते.     
                        
        
या वेळी मार्गदर्शन करताना डॉ. उपेंद्र धोंडे म्हणाले, ‘ पाणी विषयक सर्व क्षेत्रात, सर्व विद्याशाखेतील विद्यार्थ्यांना चांगली कारकिर्द करण्याच्या संधी आहेत. भूजल, जैवप्रक्रिया, जीऑलॉजी, प्रशासन, खासगी कंपन्या यात जगभर काम करण्याच्या संधी आहेत.’

डॉ. सचिन पुणेकर म्हणाले, ‘पाणी सर्वत्र आहे, त्यामुळे जल क्षेत्रातील कामाची गरज आणि संधी सर्वत्र आहे. पाण्याला आणि पाणी विषयक प्रश्नांना प्राथमिकता दिली पाहिजे. स्वयंसेवी संस्था, माध्यमे क्षेत्रातही चांगल्या कामाला वाव आहे.’

रोटरी क्लब पुणे, डिस्ट्रीक्ट ३१३१ च्या वॉटर कमिटीचे अध्यक्ष सतीश खाडे म्हणाले, ‘पाणी आणि पाणीप्रश्न हे संकट झाले आहे. या संकटातून संशोधनापासून जलसंरक्षण, जलसंधारणापर्यंत कारकिर्दीच्या संधी आहेत. त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.’

अभिजित घोरपडे म्हणाले, ‘महाराष्ट्रातील पाणी, तसेच पाण्याचे जुने स्रोत याचाच पुनर्वापर कसा करता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे. हे जुने स्रोत आणि साधने दाखवणे हेदेखील ‘वॉटर टुरिझम’चे नवे करियर होऊ शकते. जलक्षेत्रातील अभ्यासासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आंतरराष्ट्रीय पातळीवर परस्पर सहकार्याद्वारे कार्यरत राहणार आहे.’

प्राचार्य डॉ. शैला बूटवाला यांनी स्वागत केले. रोटेरीयन पद्मजा नायडू, बनकर उपस्थित होते. रोटरी क्लब कोथरूड व रोटरी क्लब अमनोरा यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.    
                        
पाण्याविषयी जागरूकता, जलसाक्षरता निर्माण करण्यासाठी हा जलोत्सव आयोजित करण्यात आला असून, या उपक्रमाचे हे तिसरे वर्ष आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना जल क्षेत्रात असलेल्या कारकिर्दीच्या संधींवर मार्गदर्शन करण्यावर या वर्षी भर देण्यात येत आहे . 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link