Next
पुण्यातील विद्यार्थ्यांनी बनवला स्वस्त किमतीतला ड्रोन
राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे संशोधन
BOI
Thursday, August 01, 2019 | 12:10 PM
15 0 0
Share this article:


पुणे : येथील जेएसपीएमच्या राजर्षी शाहू महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आग लागलेल्या ठिकाणाची आकाशातून दृश्ये टिपून नेमक्या स्थितीची माहिती देणारा ड्रोन निर्माण केला आहे. दीर्घकाळ उड्डाण करू शकणाऱ्या आणि स्वस्त किंमतीतील या ड्रोनची आयआयटी गुवाहाटीतर्फे आयोजित ‘टेक एक्स्पो २०१९’च्या पहिल्या फेरीत निवड झाली आहे. 

विवेक गवळी, शिवप्रताप बिरदार, प्रणव ढवळे आणि  मानसी खेडेकर या चार विद्यार्थ्यांनी हे संशोधन केले असून, आयआयटी गुवाहाटीतर्फे आयोजित ‘टेक्निक’ या  वार्षिक टेक्नो-मॅनेजमेंट फेस्टिव्हलमधील ‘टेक एक्स्पो’मध्ये त्यांनी हे संशोधन सादर केले. आगीच्या घटनांमध्ये त्या ठिकाणचे हवाई चित्रण उपलब्ध झाले, तर आग नियंत्रित करण्यास मदत मिळू शकते. या उद्देशाने या विद्यार्थ्यांनी पारंपरिक ड्रोनपेक्षा अधिक वेळ उड्डाण करू शकणारा हा अत्यंत कमी किंमतीतील ड्रोन तयार केला आहे. त्याची उपयुक्तता लक्षात घेऊन पहिल्या फेरीत निवड करण्यात आली.

या प्रकल्पासाठी विद्यार्थ्यांना डॉ. प्रवीण घटे यांच्याकडून मार्गदर्शन मिळाले. इलेक्ट्रॉनिक दूरसंचार विभागाचे प्रमुख डॉ. भागवत जाधव, संतोष बोराडे, प्राचार्य डॉ. आर. के. जैन आणि ‘जेएसपीएम’चे संस्थापक तानाजी सावंत यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 21 Days ago
Patent is a very powerful and necessary tool in the field of marketing . There are specialists who work in this field . Chamber of Commerce may be able to find a suitable firm .
0
0
Bankhele Kishor About 22 Days ago
Best of luck
0
0
Rajashri About 22 Days ago
Very very good job💐👍👌✌
0
0
Dr Raju Panchal About 23 Days ago
It's great achievement by the JSPM's RSCOE Students In modern era cost effective and usability is very much important Good luck
0
0

Select Language
Share Link
 
Search