Next
सुहास मेहता यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विवेक संवाद पुरस्कार प्रदान
BOI
Friday, October 11, 2019 | 12:06 PM
15 0 0
Share this article:



ठाणे :
ठाणे शहरातील प्रख्यात उद्योजक सुहास मेहता यांना नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘विवेक संवाद’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. व्यवसायाच्या माध्यमातून उत्तम कामगिरी केल्यामुळे त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. 

सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेच्या आधारे देशात ऊर्जासंवर्धन केले पाहिजे, या विचाराने प्रेरित झालेल्या सुहास मेहता यांनी १९८५ साली एसएमसी इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीची स्थापना केली. या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी ठाणे, मुंबई, बेंगळुरू आदी भागांत रस्त्यावरील दिवाबत्तीची कामे केली असून, त्यासाठी सोलर पॅनलचा वापर केला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन ‘उद्योग विवेक’च्या वतीने त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. बीएसई इंटरनॅशनल कन्व्हेंशन हॉलमध्ये नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search