Next
‘प्रत्येक शेतकऱ्यासाठी एका शेततळ्याचे उद्दिष्ट’
BOI
Wednesday, November 08 | 04:20 PM
15 0 0
Share this story

औरंगाबाद : प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतात एका शेततळ्याचे उद्दिष्ट ठेवण्याच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आज दिल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित जलयुक्त शिवार अभियान, फळबाग लागवड नाडेप, गांडूळ खत, तुती लागवड, सिंचन विहीर व शेततळ्याच्या कामाचा आढावा भापकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी अपर आयुक्त शिवानंद टाकसाळे, विभागीय कृषी सहसंचालक रमेश भताने, अधीक्षक कृषि अधिकारी पी.एस. शिंदे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ, उपजिल्हाधिकारी शिवाजी शिंदे, संदीप पाटील उपमुख्य कार्यकारी अधिकारी (रोहयो) अनंत कुंभार, विभागातील सर्व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांची उपस्थिती होती.

विभागात २५ हजार हेक्टरवर फळबाग लागवड करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगून भापकर म्हणाले, ‘प्रत्येक संबंधित अधिकाऱ्यांनी किमान एक गाव दत्तक घेऊन त्या गावात ५० शेततळी करण्याचे उद्दिष्ट ठेवा; तसेच तहसिल कार्यालयात मनुष्यबळ उपलब्ध करुन डिसेंबरपर्यंत फळबाग लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करावे.’ जलयुक्त शिवार अभियान विभागात पुन्हा एकदा जोरदारपणे राबविण्यासाठी जिल्हानिहाय आढावा घेण्याच्या सूचना देखील त्यांनी यावेळी केल्या; तसेच ‘मनरेगा’अतंर्गत नाडेप कंम्पोस्ट, गांडूळ खत आदी विविध योजनांच्या लार्भार्थ्यांची यादी येत्या तीन दिवसात तयार करण्याच्या सूचनाही डॉ. भापकर यांनी दिल्या.

या वेळी भापकर यांनी जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे, ‘मनरेगा’अंतर्गत फळबाग लागवड, नापेड कंम्पोस्ट, व्हर्मी कंम्पोस्ट आदी विविध विषयांच्या सद्यस्थितीचा सविस्तर जिल्हानिहाय आढावा घेतला.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link