Next
विसाव्या शतकातील मातंग समाज
BOI
Friday, January 25, 2019 | 10:46 AM
15 0 0
Share this story

भारतीय समाजरचना ही जाती व्यवस्थेवर अवलंबून आहे. यात देशातील सर्व राज्यांत विविध नावाने अस्तित्वात असलेला मातंग हा एकमात्र समूह आहे, अशी माहिती देऊन प्रा. सोमनाथ डी. कदम यांनी ‘विसाव्या शतकातील मातंग समाज’मधून सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय व शैक्षणिक परिवर्तनाला सामोरे गेलेल्या मातंग समाजाचा इतिहास कथन केला आहे.

मातंग संज्ञेचा अर्थ, त्याची व्युत्पत्ती, मातंग जातीची उत्पत्ती, त्या विषयीच्या दंतकथा, मातंगांचा प्राचीन धर्म, मातंग राज्ये व त्यांचे राजे, मातंग समाजातील संत, भारतातील मातंग समाज व त्यातील जाती-पोटजाती, महाराष्ट्रातील मातंग समाज यांची माहिती समजते. भारतात ब्रिटिशांचे राज्य आल्यावर मातंग समाजाची स्थिती, त्याची बोलीभाषा, शैक्षणिक स्थिती, विविध चळवळीतील त्याचा सहभाग याबद्दल नमूद करून आंबेडकरपूर्वकालीन, आंबेडकरकालीन व स्वातंत्रोत्तर मातंग समाजाचे वर्णन करताना समाजासाठी झातालेल्यांचे व्यक्तिचित्रण, संस्था-संघटना, लढे-चळवळी यांचा इतिहास सांगितला आहे. समाजाचे समकालीन वास्तव व पुढील दिशाही यातून स्पष्ट केली आहे.

पुस्तक : विसाव्या शतकातील मातंग समाज
लेखक : सोमनाथ कदम
प्रकाशक : संवाद प्रकाशन
पाने : १४३
किंमत : १५० रुपये

(या पुस्तकाचा सविस्तर परिचय वाचण्यासाठी येथे क्लिक करा)

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
MORE SATYAM DHONDIBA About 8 Days ago
very nice sir
0
0

Select Language
Share Link