Next
गुड मॉर्निंग न्याहारी + नाश्त्याचे निराळे पदार्थ + फळे आणि फळांचे पदार्थ
BOI
Friday, September 14 | 10:54 AM
15 0 0
Share this story

रात्री लवकर जेवल्यानंतर सकाळी चांगली भूक लागत असल्याने न्याहरीतील खाणे पोषक असावे, हे लक्षात घेऊन शेफ नीलेश लिमये यांनी ‘गुड मॉर्निंग न्याहरी’मधून सूप, मॉर्निंग नेक्टर म्हणजेच ज्यूस, सँडविच-टोस्ट, कोल्हापुरी मिसळ, घावन-धिरडी-पराठे, इडली-डोसे-अप्पे, खमंग ढोकळा, अंड्यांच्या पदार्थांच्या कृती दिल्या आहेत.

नाश्त्यासाठी वेगळे पदार्थ घरच्या घरी करता येतात याची जंत्री प्रिया संजय नाईक यांनी ‘नाश्त्याचे निराळे पदार्थ’मधून दिली आहे तिखट प्रकारात ८६ पाककृती आहेत. गोडात गव्हाची खीर, पाकातील पुऱ्या, मलईचे सँडविच असे १४ पदार्थ, उपवासाचे १३ पदार्थ आहेत.

नाश्ता झाल्यावर आता फळांची डिश किंवा ज्यूस देण्याची पद्धत रूढ होत आहे. यासाठी पुष्पा रत्नाकर राजे यांनी ‘फळे यांनी फळांचे पदार्थ’ यात फळांपासून स्मुदी, केक, पुडिंग, हलवा, फ्रुट डिलाइट, आइस्क्रीम, फळांची बर्फी व वडी, डेलिकसीज आदी वैविध्यपूर्ण पदार्थांची कृती सांगितल्या आहेत. फळांमधील उपयुक्त घटक, त्यांची आरोग्यासाठी गरज आदी माहितीही दिली आहे.

प्रकाशक : साठे प्रकाशन
पाने : ३०४
किंमत : २३० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link